शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घर नाही, शौचालय बांधावे कुठे ?

By admin | Updated: June 26, 2017 00:05 IST

प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे.

ग्रामस्थ हैराण : शंभर टक्के हागणदारीची अट त्रासदायक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक गावाला १०० टक्के हागणदारीमुक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने गोरगरीब जनतेच्या अडचणी ओळखून शौचालयाची ही अट रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.पाच एकर शेती असलेल्या बीपीएलधारकाला शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान दिले जाते तर एपीएलधारकांना रोहयोतून योजनेचा लाभ दिला जातो. एपीएलधारकांना आधी स्वखर्चाने शौचालय बांधून मग अनुदान दिले जाते. मात्र, आता गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याशिवाय कोणत्याही योजनांचा लाभ न देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे अनेक गावे वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजनांपासून वंचित आहेत. ग्रामीण भागात भाऊबंदकीमुळे अनेक कुटुंब विभक्त झाली आहेत. अनेकांची गुुजराण एका खोलीत सुरू आहे. रहायलाच पुरेशी जागा नसताना शौचालय बांधायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कित्येक कुटुंब गावात अतिक्रमण करून राहात आहेत. मग, अतिक्रमित जागेत शौचालय बांधायचे काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. पूर्वी हागणदारीमुक्तीची अट टप्प्याने राबवून त्यानुसार योजनांचा लाभ दिला जात होता. गाव ७० टक्के हागणदारीमुक्त झाल्यास त्या गावाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असे. परंतु आता शंभर टक्के हागणदारीमुक्तीची अट घातल्याने ग्रामीण विकासात मोठा अडसर निर्माण झाला आहे. पयार्याने गावाचा विकास खुंटला आहे. राहण्यासाठीच पुरेशी जागा उपलब्ध नसताना शौचालयाची अट कशी पूर्ण करावी, हा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावतोय. परिणामी गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त होण्याच्या अटींची पूर्तता होऊ शकत नाही. ‘पेपरलेस’चे काय ?शासनाचे सर्व कामकाज पेपरलेस करण्यावर सरकारचा भर असला तरी झेडपीतील विविध १४ विभाग पेपरलेस करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आजही फाईली वेगवेगळ्या टेबलवर फिरत असून त्याचा आर्थिक फटका संबंधिताना सहन करावा लागत आहे. अकाऊंटमध्ये प्रशासनाची मास्टरी असतानाही कामकाज पेपरलेस होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. झेडपीतील केवळ १४ विभागा पेपरलेस झाले आहेत.