शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

भरपाई मिळालीच नाही; रुपयात विमा काढून उपयोग काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:01 IST

Amravati : पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा योजनेत सहभाग असल्याने गतवर्षी पाच लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. पिकांचे नुकसान झाले असतानाही कंपनीद्वारा परतावा देण्यात आलेला नाही. त्याचा फटका यंदा बसल्याचे दिसून येत आहे. मुदत संपण्याला फक्त १० दिवस बाकी असताना केवळ एक लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी घेता येतो. गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५.१० लाख अर्जाद्वारे या मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावर्षी सुद्धा अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात यंदा शेतकऱ्यांचा सध्या फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येते.

विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकरी स्वतः केंद्र सरकारच्या विमा पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये बचत खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो. विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत ही विमा योजनेत सहभागी होता येते शिवाय सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो, असे कृषी विभागाने सांगितले.

योजनेत शेतकरी सहभागाची सद्यस्थितीकर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज               - १५६४गैरकर्जदार शेतकरी सहभाग          - ३५६९५ जुलैपर्यंत शेतकरी सहभाग          - ९५१३३गतवर्षी तुलनेत सध्या सहभाग         - १८.६६गतवर्षी सहभागी शेतकरी संख्या     - ५,०९,५४५

गतवर्षीच्या परताव्यासाठी शेतकरी संतप्त● गतवर्षी बाधित पिकांसाठी तब्बल १६९५६३ पूर्वसूचना कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १,१२,६०४ सूचना (६६.४० टक्के) कंपनीद्वारा नाकारण्यात आल्या. शिवाय फेर तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कंपनीद्वारा पालन नाही.

● कंपनीकडे शेतकरी हिस्सा, राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा असे एकूण ३८२.३५ कोटी जमा झाले. तुलनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती ३७.५० कोटी, प्रतिकूल हवामान ९.३८ कोटी, काढणीपश्चात २.८३ कोटी, असा एकूण ४८.७७ कोटींचा परतावा देण्यात आला आहे.

गतवर्षीच्या परताव्यासाठी पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. यंदाही एक रुपयात सहभागी होता येत असल्याने शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यावा. या योजनेद्वारे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळते- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीfarmingशेती