शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari: बांधून दाखवला... 5 दिवसांत 75 किमी महामार्ग बनवला, हायस्पीड रस्ते कामाचा वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 10:16 IST

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील या वेगवान रस्ते कामाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे.

नवी दिल्ली/अमरावती - केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं विरोधकही कौतुक करतात. गडकरींच्या कार्यकाळात देशात अनेक राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल आणि मोठ-मोठे रस्ते बाधण्यात येत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेरच्या कामानंतर दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना रोडकरी असं केलं होतं. आता, गडकरींनी पुन्हा एकदा रोडकरी असल्याचं आपल्या कामातून दाखवून दिलंय. अमरावती ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील 75 किमीचा रस्ता केवळ 5 दिवसांत बनवून पूर्ण झाला आहे. 

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील या वेगवान रस्ते कामाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाल्याची माहिती स्वत: नितीन गडकरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली. तसेच, हा राष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी ट्विटवरुन म्हटले आहे. गडकरींनी या रोडसाठी काम करणाऱ्या सर्वच घटकांचे आभार मानले आहेत.  3 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून या कामाला सुरुवात झाली होती. हे काम सलग 110 तास कार्यरत राहिल्याने 75 किलोमीटरपर्यंत लोणी ते माना या गावापर्यंतचा रस्ता केवळ 5 दिवसांत बांधून पूर्ण विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हायस्पीड कामाला निसर्गाचीही साथ लाभली. गेल्या 5 दिवसांत या रस्ते मार्गावर पाऊसानेही दडी मारली होती. त्यामुळे, हे काम शक्य झाले. 

अमरावती ते अकोला हा महामार्ग मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून खराब स्थितीत होता. या मार्गाचे काम यापूर्वी तीन कंपन्यांना देण्यात आले होते, मात्र हे काम सतत रखडल्यामुळे या मार्गाऐवजी अमरावती ते अकोला प्रवास नागरिक दोन वर्षांपासून दर्यापूर मार्गे बनलेल्या उत्कृष्ट रस्त्यावरून करत होते. महाराष्ट्रातील अतिशय खराब रस्ता म्हणून ओळख असणारा अमरावती अकोला हा मार्ग आता विक्रमी नोंद करून उत्कृष्ट बनला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकAmravatiअमरावतीAkolaअकोला