शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलद-याच्या विकासासाठी ‘एएमआरडी’, विदर्भातील सिंचनाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी :

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 18:34 IST

मी केंद्रात असलो तरी राज्यात पूर्णत: लक्ष आहे. विशेषत: विदर्भातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात असून येत्या काळात समूळपणे सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.

अमरावती : मी केंद्रात असलो तरी राज्यात पूर्णत: लक्ष आहे. विशेषत: विदर्भातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात असून येत्या काळात समूळपणे सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.नितीन गडकरी हे अमरावतीत मंगळवारी कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाशी संबंधित प्रश्नांवर बोलणे टाळले. परंतु विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलद-याच्या विकासासाठी नागपूरच्या धर्तीवर अमरावती विकास प्राधिकरण (एएमआरडी) स्थापन करण्याची तयारी दर्शविली. ना.गडकरी यांनी पर्यटनाला चालना दिल्याशिवाय गाव, शहराची प्रगत होणार नाही, ही बाब आवर्जून सांगितली. शिर्डी विमानतळाचा विकास झाला त्यातुलनेत बेलोरा विमानतळाच्या विकासाने गती घेतलेली नाही, प्रसार माध्यमांच्या या प्रश्नावर बोलताना त्यांनी लवकरच यासंदर्भात केंद्रात बैठक बोलावून बेलोरा विमानतळाचे रखडलेले प्रश्न, विकासकामांना गती मिळेल, असे ठामपणे सांगितले. सिमेंट क्रॉक्रिटने निर्मित रस्त्याचे जाळे विणले जात असून यापूर्वी रस्ते डांबरीकरणात झालेले अपहार, भ्रष्टाचारातून मुक्ती मिळेल, असे ते म्हणाले. अमरावती येथे दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या तपोवन कुष्ठधाम संस्थेच्या विकासावर लक्ष दिले जाईल. येत्या काही दिवसांत शिवाजी ऊर्फ दादीसाहेब पटवर्धन व संत गुलाबराव महाराज यांचे टपाल तिकिटांचे प्रकाशन केले जाईल, असे गडकरी म्हणाले. कौटुंबिक कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, आ.अनिल बोंडे, महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, प्रभाताई मराठे, संध्या मराठे, विलास मराठे, विवेक मराठे, विनोद मराठे, अतुल आळशी, संजय अग्रवाल, अरविंद मराठे, किरण पातुरकर, जयंत डेहनकर आदी उपस्थित होते.

गडकरींचा भावपूर्ण सत्कारनितीन गडकरी हे अमरावतीत कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले असता त्यांचा ‘हिंदूस्थान’ परिवाराच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी मराठे कुटुंबीयांनी ना.गडकरी यांचा भलामोठ्या गुलाब पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी ग्रंथ भेट देण्यात आला.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी