शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

नीती आयोगाकडून राज्यातील ५५६ शाळांना अटल टिंकरिंग लॅब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 17:32 IST

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत देशपातळीवर ६ हजार ३८ शाळांना नव्याने अटल टिंकरिंग लॅब देण्यात आल्या आहेत.

परतवाडा (अमरावती) : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत देशपातळीवर ६ हजार ३८ शाळांना नव्याने अटल टिंकरिंग लॅब देण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील ५५४ आणि विदर्भातील ८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना ३१ जानेवारी २०२०पर्यंत सर्व प्रक्रिया करावयाच्या आहेत. मुलांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात जिज्ञासा वाढावी, त्यांनी नव्या उपकरणांची निर्मिती करून संशोधनाकडे वळावे, या हेतूने अटल टिंकरिंग लॅब शाळांना मान्य करण्यात आल्या आहेत. वैज्ञानिक साधने व विविध उपकरणांसाठी नीती आयोगाकडून निधी दिला जाणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित विषयातील संकल्पना शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवून त्यांचे कौशल्य विकसित करण्याकरिता आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याकरिता निवड झालेल्या शाळांना अर्थसाहाय्य केल्या जाणार आहे. प्रभारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. विदर्भातील ८८ पैकी नागपूर जिल्ह्यात २४, अमरावती २०, गोंदिया ९, यवतमाळ ८, गडचिरोली ७, अकोला ५, चंद्रपूर ४, भंडारा ३, बुलडाणा ३, वर्धा ३ आणि वाशिम जिल्ह्यात २ शाळांचा समावेश आहे. ग्रामीण भागासह आदिवासी आश्रमशाळांचीही याकरिता निवड करण्यात आली. यापूर्वीही नीती आयोगाकडून वेगवेगळ्या शाळांना अटल टिंकरिंग लॅब दिल्या आहेत. ----------------अचलपूर तालुक्यात आठ शाळांना लॅब अमरावती जिल्ह्यातील २० शाळांमध्ये अचलपूर शहरातील राष्ट्रीय हायस्कूल, परतवाडा शहरातील आयईएस गर्ल्स हायस्कूल व म्युनिसिपल हायस्कूल यांचा समावेश आहे. या शाळांना ब-याच प्रतीक्षेनंतर ही लॅब मंजूर झाली. अचलपूर तालुक्यातील जनता हायस्कूल (शिंदी बु.), जनता हायस्कूल (हरम), जनता हायस्कूल (परसापूर) व स्वरूपसिंह हायस्कूल (पथ्रोट) आणि  दत्ताप्रभू आश्रमशाळा (पिंपळखुटा) येथेही अटल टिंकरिंग लॅब मान्य करण्यात आली आहे. ----------------सर्वप्रथम लाभ करजगावलाअमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वप्रथम करजगाव येथील शंकररराव विद्यालयाला यापूर्वीच अटल टिंकरिंग लॅब नीती आयोगाकडून देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स , मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल किट्स, थ्री-डी प्रिंटर, ड्रोन, टेलिस्कोप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, रोबोटिक्स, शोल्डरिंग किट्स, विविध प्रकारचे सेन्सरसह अन्य प्रकारचे साहित्य करजगाव येथील लॅबला नीती आयोगाकडून मिळाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी ते हाताळत आहेत.