नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी नऊ स्पेशल ट्रेन्स सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:00 AM2020-09-05T06:00:00+5:302020-09-05T06:00:05+5:30

नागपूर येथे होणाऱ्या नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी जाणाºया विद्यार्थ्यांकरीता मध्य रेल्वेकडून ९ स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहे.

Nine special trains will leave for National Defense and Naval Academy examinations | नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी नऊ स्पेशल ट्रेन्स सुटणार

नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी नऊ स्पेशल ट्रेन्स सुटणार

Next
ठळक मुद्देपरीक्षार्थींसाठी सुविधाआरक्षण अनिवार्य


लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : नागपूर येथे होणाऱ्या नॅशनल डिफेन्स व नेव्हल अकॅडमीच्या परीक्षांसाठी जाणाºया विद्यार्थ्यांकरीता मध्य रेल्वेकडून ९ स्पेशल ट्रेन सोडल्या जाणार आहे. अमरावती व बड़नेरा रेल्वे स्थानकावरून विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
या ट्रेनमध्ये सात एक्सप्रेस गाडया व २ मेनू गाडया राहतील. यातील एक्सप्रेस गाडयांसाठी आरक्षण अनिवार्य व दोन मेनू गाडयांसाठी जनरल तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या सर्व एक्सप्रेस गाडया सीएसएमटी, नाशिक, जळगाव, पुणे व कोल्हापूर येथून बडनेरामार्गे नागपूरकडे जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना परतीच्या प्रवासासाठी याच गाडया नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. अमरावती ते नागपूर व अकोला ते नागपूर या दोन मेनू रेल्वे गाडयादेखील सोडल्या जाणार आहे. परीक्षांना बसणाºया विद्यार्थ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध केली आहे.
५, ६ व ७ सप्टेंबरला या गाडया बडनेरा रेल्वेस्थानकात येणार आहेत. त्या अनुषंगाने या रेल्वे गाडयांच्या वेळा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Nine special trains will leave for National Defense and Naval Academy examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.