शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
3
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
4
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
5
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
6
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
7
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
8
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
9
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
10
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
11
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
12
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
13
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
14
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
15
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
16
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
17
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
18
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
19
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
20
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका

पशुसंवर्धन विभागात मिळणार नऊ सेवांची हमी

By admin | Updated: July 21, 2015 00:26 IST

पशुंचे खच्चिकरण, वंध्यत्व व तपासणी यासह पशुसंवर्धन विभागात पशुधन पालक आणि शेतकऱ्यांना सेवा हमी...

शासन निर्णय : कुचराई केल्यास होणार कारवाईअमरावती : पशुंचे खच्चिकरण, वंध्यत्व व तपासणी यासह पशुसंवर्धन विभागात पशुधन पालक आणि शेतकऱ्यांना सेवा हमी कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र देणे यासारख्या या विभागाशी संबंधित ९ प्रकारच्या सेवा निश्चित वेळेत मिळाल्या नाहीत तर शेतकरी आणि पशुधन पालक त्या विरोधात दाद मागता येणार आहे. अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विलंब करून सेवा पुरविण्यास दिरंगाई केल्याचे निष्पन्न झाल्यास त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या ९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. तसेच या सेवा नेमक्या किती कालावधीत पुरवाव्यात, त्याची कालमर्यादा आणि निश्चित कालावधीत सेवा पुरवली नाही तर दाद मागता येईल, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी यापूर्वी सूचना काढून जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेत नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यातील युती सरकारने पहिल्याच बैठकीत नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी कायदा करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने अध्यादेश जारी करण्यात आला होता. या कायद्यामुळे जनतेला निश्चित वेळेत सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. सरकारी अधिकारी वेळेत काम करण्यास बांधील आहेत. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद या कायद्यात असल्याने अनियमितता भ्रष्टाचारासारखे प्रकार नक्कीच कमी होतील, असा आशावाद राज्याच्या भाजपा शिवसेना सरकारने व्यक्त केला आहे. या कायद्यानुसार शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. पशुसंवर्धन आयुक्तांनी अधिसूचना काढून पशुसंवर्धन विभागाच्या ९ सेवा अधिसूचित केल्या आहेत. ठराविक मुदतीत सेवा न मिळाल्यास शेतकऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करता येणार आहे. प्रत्येक सेवेसाठी प्रथम व द्वितीय अपीलीय अधिकारी ठरवून देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)अशा आहेत सेवा शर्तीपशुंचे खच्चिकरण, पशुसोबतच असल्यास त्याच दिवशी दवाखान्याचे वेळामध्ये ,वंध्यत्व व तपासणी पशुसोबतच असल्यास त्याच दिवशी दवाखान्याचे वेळामध्ये,शवविच्छेदन न कुजलेले मीत प्राणि सादर केल्यास त्याच दिवशी केवळ अहवाल तीन दिवसांचे आत, पशुंची नमुने तपासणी आजारी पशु दवाखान्याचे वेळेमध्ये आणल्यास नमुने गोळा करणे त्याच दिवशी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक गट (अ)तालुका लघु पशुसवर चिकित्सालय व जिल्हा पशुसर्वचिकित्सालय तीन दिवसाचे आत, आरोग्य तपासणी व दाखला देणे, पशु दवाखान्याचे वेळेमध्ये आणल्यास त्याच दिवशी आणि प्रमाणपत्र तीन दिवसात, गर्भ तपासणी गायी व म्हशींची त्याच दिवशी, गायी व म्हैशींना कूत्रीम रेतन करणे उपयुक्त काखंडात असल्यास त्याच दिवशी अशा प्रकारे विविध मुद्यावर सेवा हमी देणार आहे.