लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचे संक्रमण रोज नव्या भागात होत आहे. शनिवारी नऊ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१२ वर पोहोचली आहे. यामध्ये अंबागेट या नव्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाला पॉझिटिव्ह आलेला आहे. फ्रेजरपुरा भागात ४० वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे एकाच कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धासह ५४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. शनिवारी सायंकाळी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या १२० झालेली आहे.
Corona Virus in Amravati; अमरावतीत नऊ पॉझिटिव्ह; एकूण २१२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:23 IST
अमरावतीत कोरोनाचे संक्रमण रोज नव्या भागात होत आहे. शनिवारी नऊ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१२ वर पोहोचली आहे. यामध्ये अंबागेट या नव्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे.
Corona Virus in Amravati; अमरावतीत नऊ पॉझिटिव्ह; एकूण २१२
ठळक मुद्देनव्या भागात संक्रमण