शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

तळेगाव दशासर येथे नऊ लाखांचे बनावट बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

एका मालवाहू वाहनाने धामणगाव तालुक्यात बोगस बियाणे येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यांनी नाकाबंदी केली असता देवगाव फाट्यावर एमएच २७ झेड ६५६९ या वाहनात नऊ कट्टे बोगस बियाणे आढळून आले. या कट्ट्यावर धामणगाव एम.एच. फौजी साहब, असे नमूद आहे.

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : धामणगाव तालुक्यात विक्रीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : खरीप हंगामात विक्री होणारे तब्बल ९ लाखांचे बनावट कपाशी बियाणे तालुक्यातील देवगाव येथे जप्त करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने सोमवारी दुपारी ४ वाजता पेट्रोलींग दरम्यान ही कारवाई केली.एका मालवाहू वाहनाने धामणगाव तालुक्यात बोगस बियाणे येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यांनी नाकाबंदी केली असता देवगाव फाट्यावर एमएच २७ झेड ६५६९ या वाहनात नऊ कट्टे बोगस बियाणे आढळून आले. या कट्ट्यावर धामणगाव एम.एच. फौजी साहब, असे नमूद आहे. सदर ९ कट्टे तपासले असता त्यात बीजीएम ४ एक्सजीआयएन नावाने तीनशे पाकीट, सिकंदर हैदराबाद कॉटन सीड्स नावाने एकूण २०० पाकिटे, कोहिनूर कॉटन हायब्रीड सीड्स न्यू टेक्नॉलॉजीचे १०० पाकिटे, धनलक्ष्मीचे १०३ पाकिटे, हर्षा ५५५ बीजी टू नावाने ९६ पाकिटे तसेच कॉटन एसएस कॉटन सीड्स या नावाची ९९ पाकिटे, असे एकूण ८९८ पाकिटे मिळाले. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे यांनी पाहणी केली असता, सदर पाकिटांवर उत्पादक तसेच विपणन करता यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. गुणवत्ता नियंत्रक कृषी अधिकारी यांच्याकडून तपासणी केली असता, ते सर्व बियाणे बोगस असल्याचे स्पष्ट झाले. सपोनि अजय आकरे यांच्या नेतृत्वात अजमत सैय्यद, स्वप्निल तंवर, पंकज फाटे, विजय अवचार यांनी केली. धामणगाव तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी तक्रार नोंदवली. चालक रामबीर रामचरण सिंग (ह.मु.बोरगाव धांदे) याला अटक केली आहे.