शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:28 IST

कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन शहरातील विविध प्रभागांत कार्यरत नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई महापालिकेने केली. ‘लोकमत’ने डेंग्युच्या प्रकोपाचा मुद्दा उचलून धरल्यावर महापालिकेने ही कारवाई केली, हे येथे उल्लेखनीय! निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली असली तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची तलवार उगारणार तरी केव्हा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : डेंग्यूसंबंधीची दिरंगाई भोवली, 'लोकमत'च्या वृत्तमालेनंतर हलले प्रशासन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन शहरातील विविध प्रभागांत कार्यरत नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई महापालिकेने केली. ‘लोकमत’ने डेंग्युच्या प्रकोपाचा मुद्दा उचलून धरल्यावर महापालिकेने ही कारवाई केली, हे येथे उल्लेखनीय! निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली असली तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची तलवार उगारणार तरी केव्हा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये प्रभाग ३ नवसारीचे आरोग्य निरीक्षक एन.बी.पाठक, बेनोडा प्रभाग १०चे सचिन हगवणे, संकेत सावंत, साईनगर प्रभाग १९चे गणेश मडावी, जोग स्टेडियम प्रभाग ८ चे ए.जी.आकोडे, फ्रेजरपुरा ११चे सागर शेगोकार, राजापेठ प्रभाग १८ चे ओ.एच. कोेल्हे, जमील कॉलनी प्रभाग ४ चे के.ए. बावणकर, एसआरपीएफ प्रभाग १४ चे अश्विनी बमनोटे यांचा समावेष आहे. या निरीक्षकांना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील साफसफाई कामांवर नियंत्रण ठेवण्याकरिता बाह्य यंत्रणांद्वारे नेमणूक देण्यात आली होती.'लोकमत'ची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शहरात झपाट्याने पसरत असलेल्या डेंग्यूसंदर्भात बैठक बोलविली होती. महापालिका आयुक्तांना त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.शहरात डेंग्यूची साथ पसरली असतानाही अस्वच्छता कायम आहे. नागरिक भयभीत आहेत. आरोग्य विभाग स्वच्छतेबाबत दिरंगाई करीत असल्याने साथीचे आजार पुन्हा पसरण्याचा धोका आहे. यामुळे या विषयात मोठी कारवाई अपेक्षित असताना, फक्त कंत्राटी निरीक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. शहरभरातील आठ लक्ष लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांवर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शहरतील जाणकारांमध्ये त्यामुळे करण्यात आलेली कारवाई अपूर्ण असल्याचा सूर उमटला होता.डेंग्यू हा अमरावतीकरांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न ठरला आहे. स्वच्छतेच्या कामात दिरंगाई केल्यामुळे आयुक्तांच्या आदेशाने नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे.- नरेंद्र वानखडे, उपआयुक्त ( सामान्य)