लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नजीकच्या नांदगाव पेठ येथे मुस्लिमांच्या इज्तेमा या धार्मिक सोहळ्याचे येत्या ७ ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता देशभरातून मुस्लिम बांधव एकवटणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने विशेष सहा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रवाशांनी गैरसोय आणि तारांबळ उडू नये, यासाठी रेल्वे स्थानकांवर नऊ अतिरिक्त तिकीट खिडक्या उभारल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने तयारी चालविली आहे.नांदगाव पेठ येथे होऊ घातलेल्या इज्तेमा या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता दूर प्रांतातील मुस्लिम बांधव अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर येणार आहेत. आयोजकांनी त्यांच्या स्तरावर जोरदार तयारी चालविली आहे. मात्र, इज्तेमा कार्यक्रमात सुमारे दीड ते दोन लाखांच्यावर परप्रातांतून मुस्लिम बांधव उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाासह रेल्वे विभागाने उपाययोजना चालविल्या आहेत. तीन दिवसीय सोहळ्यासाठी बाहेरगावाहून रेल्वेने येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अमरावती रेल्वे स्थानकावर दोन खिडक्या असणार आहेत. रॉयली प्लॉट भागाकडे आणि मॉडेल रेल्वे स्थानकावर अतिरिक्त दोन तिकीट खिडक्या असणार आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त सात खिडक्या असणार आहेत. यात दोन खिडक्या गांधी विद्यालय भागाकडे तर, पाच खिडक्या नियमित स्थळी असणार आहेत. रेल्वेच्या वरिष्ठांनी नियोजन करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार वाणिज्य विभागाने नऊ खिडक्यांवर संगणक लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. आयोजकांनी रेल्वे मंत्र्यांकडे या धार्मिक सोहळ्यासाठी अतिरिक्त सहा रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली आणि ती मंजूर झाली.अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर एकूण ९ खिडक्या अतिरिक्त असतील. इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर या तिकीट खिडक्या असेल. त्यानंतर ही सुविधा राहणार नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा पुरविली जाईल.- शरद सयाम,मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा.
रेल्वे स्थानकांवर नऊ अतिरिक्त तिकीट खिडक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST
तीन दिवसीय सोहळ्यासाठी बाहेरगावाहून रेल्वेने येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अमरावती रेल्वे स्थानकावर दोन खिडक्या असणार आहेत. रॉयली प्लॉट भागाकडे आणि मॉडेल रेल्वे स्थानकावर अतिरिक्त दोन तिकीट खिडक्या असणार आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त सात खिडक्या असणार आहेत. यात दोन खिडक्या गांधी विद्यालय भागाकडे तर, पाच खिडक्या नियमित स्थळी असणार आहेत.
रेल्वे स्थानकांवर नऊ अतिरिक्त तिकीट खिडक्या
ठळक मुद्देइज्तेमाच्या पार्श्वभूमीवर सुविधा : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी व्यवस्था