शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

खातेनिहाय विभागीय आॅनलाइन परीक्षेला बगल, सामान्य प्रशासन मंत्रालयाची अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 17:23 IST

राज्य प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या खाते अंतर्गत विभागीय परीक्षा आॅनलाइन घेण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्या आहेत.

- गणेश वासनिकअमरावती : राज्य प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या खाते अंतर्गत विभागीय परीक्षा आॅनलाइन घेण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्या आहेत. मात्र, गेल्या ११ वर्षांपासून विभागीय परीक्षा अभ्यासक्रमात कोणताही बदल न करता सामान्य प्रशासन विभागाने ब्रिटिशकालीन कारभार चालविला आहे. या परीक्षेत मोठे ह्यफिक्सिंगह्ण होत असल्याची माहिती पुढे आली आहे.शासनाच्या एकूण ३० विभागांतील अधिकारी, कर्मचा-यांना शासनसेवेत प्रवेशानंतर स्थायीकरण, पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा देणे ही नियमावली आहे. सन १९५० ते १९६० या काळात विभागीय परीक्षेसाठी अभ्यासक्रम होता. विभागीय सेवा प्रवेशाची नियमावली ही भारतीय घटनेच्या कलम ३०९ नुसार लोकसेवा आयोगाच्या सहमतीने तयार केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने अधिकारी, कर्मचा-यांच्या विभागीय परीक्षेची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे सोपविली आहे.राज्य लोकसेवा आयोगाने ६ आॅगस्ट २००७ रोजी सामान्य प्रशासनाचे अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवून विभागीय परीक्षा अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून अधिकारी, कर्मचा-यांची ही परीक्षा आॅनलाईन घेण्याबाबत निर्देश दिले आहे. तथापि, सामान्य प्रशासन विभागाने याकडे गेल्या ११ वर्षांपासून दुर्लक्ष चालविले आहे. दरवर्षी ५ ते ६ हजार अधिकारी, कर्मचा-यांना विभागीय परीक्षेला सामोरे जावे लागते. मात्र, या परीक्षेचा अभ्यासक्रम फार जुना आणि कालबाह्य असल्याने बदलत्या काळानुसार यात वस्तुनिष्ठ काहीही नाही. त्यामुळे प्रशासकीय सेवेत पदार्पण करणारे नवखे अधिकारी, कर्मचाºयांना नेमकी ही परीक्षा कशाच्या आधारे घेतली जाते, हेच कळू शकत नाही. हल्ली प्रगत तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर होत असताना सामान्य प्रशासन विभाग अधिकारी, कर्मचा-यांच्या विभागीय परीक्षा आॅनलाईन का घेत नाही, यातच गुपित दडले आहे. आॅनलाईन परीक्षा घेण्यात आल्या तर यात पारदर्शकता येईल. अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयातून परीक्षा देता येईल, हे वास्तव आहे.परीक्षेच्या बदलासाठी १३ प्रकारच्या शिफारशीलोकसेवा आयोगाने विभागीय परीक्षेसंदर्भात बदल करण्यासाठी गठित समितीने आयोगाकडे सादर केलेल्या अहवालात १३ प्रकारच्या शिफारशी सूचविल्या आहेत. परीक्षेत सुधारणा करून नवीन अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असावे, परीक्षा वर्षातून दोन वेळा घ्यावी, वस्तुनिष्ठ प्रश्नपेढी, पेपरसेटर आणि तपासणीचे पॅनेल, उत्तीर्ण गुण व उमेदवारांना मिळणारी सूट याची तरतूद, परीक्षा प्रवेश अर्जाचा नमुना, अर्जाचे शुल्क माहिती पुस्तकेसह आकारावे, उमेदवारांची माहिती त्या-त्या विभागाने प्रमाणित करून आयोगाकडे पाठवावी, परीक्षेचे वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करावे, परीक्षा आॅनलाईन घ्यावात, नवीन अभ्यासक्रम तयार होईस्तोवर जुन्याच अभ्यासक्रमाने परीक्षा घ्याव्या या बाबी यात समाविष्ट आहेत.