नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:13 AM2021-01-23T04:13:40+5:302021-01-23T04:13:40+5:30

पान ३ वरुड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीची सदस्य पदाची निवडणूक पार पडली, परंतु कुठे काँग्रेस तर कुठे भाजप आणि ...

Newly elected Gram Panchayat members await Sarpanch reservation | नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा

Next

पान ३

वरुड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीची सदस्य पदाची निवडणूक पार पडली, परंतु कुठे काँग्रेस तर कुठे भाजप आणि महाविकास आघाडी, तर कुठे अपक्ष अशी समीकरणे झाली, परंतु आता सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा गाव नेत्यांना असून, सरपंच कोण होणार, याकडे ग्रामस्थांसह नेत्यांचीही लक्ष लागले आहे, तर राजकीय नेते सरपंचपदाचे संभाव्य आरक्षण डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले आहे.

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी २५, काँग्रेस ९ आणि भाजप ७ ग्रामपंचायतींवर दावा करीत आहे. तालुक्यातील बेनोडा (शहिद) येथे संमिश्र यश मिळाले आहे, तर लोणी, राजुरा बाजार, आमनेर या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात येते. पुसला, हातुर्णा येथे काँग्रेससमर्थित पॅनल, तर भाजपने वाठोडा ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण करून बहुमताने सदस्य निवडून आणले. अनेक गावांत खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्विवाद बहुमत कुणालाच मिळाले नसून, सरपंच आरक्षणामध्ये राखीव काय येणार, याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. आरक्षण घोषित झाल्यास बहुमतात येऊनही सरपंच आरक्षणामुळे सत्ता हातून जाण्याची शक्यता आहे. सरपंच विराजमान होईपर्यंत कुणाची कोणती ग्रामपंचायत हे आज तरी सांगणे कठीण आहे.

--------

Web Title: Newly elected Gram Panchayat members await Sarpanch reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.