शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कैद्यांचा स्वतंत्र बराकीत मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

हल्ली कारागृहात जुने १३२१ पुरुष-महिला बंदीजन आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावरून आलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी कारागृह प्रशासनही सरसावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गर्दी कमी करण्यासाठी अमरावती कारागृहातून काही दिवसांपृूर्वी १५० कैद्यांना घरी सोडण्यात आले.

ठळक मुद्देकारागृहात कोरोनाची दहशत : कैद्यांची तपासणी केली अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूने संपूर्ण जग विळख्यात घेतले आहे. यातून कैदीसुद्धा सुटलेले नाहीत. त्यांना संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’च्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार, मध्यवर्ती कारागृहात येणाऱ्या नव्या कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येत आहे. कारागृहात येण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे.हल्ली कारागृहात जुने १३२१ पुरुष-महिला बंदीजन आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावरून आलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी कारागृह प्रशासनही सरसावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गर्दी कमी करण्यासाठी अमरावती कारागृहातून काही दिवसांपृूर्वी १५० कैद्यांना घरी सोडण्यात आले. याशिवाय ‘लॉकडाऊन’च्या काळात २३ मार्च ते २७ एप्रिल यादरम्यान आलेल्या नवीन कैद्यांचा स्वतंत्र बराकीत मुक्काम आहे. जुन्या कैद्यांसोबत या नव्या कैद्यांची गाठभेट होणार नाही, अशी दक्षता कारागृह प्रशासनाने घेतले आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात गुन्हेगारीची प्रमाण कमी असले तरी कोरोनाच्या दहशतीमुळे नव्या कैद्यांबाबत सोशल डिस्टन्सिंगमुळे अंतर राखूनच कारभार हाताळला जात आहे.नव्या कैद्यांचे जेवण, नाष्टा, विश्रांती, आंघोळ आणि वास्तव्य आदी बाबी स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जुन्या कैद्यांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.कारागृहात क्वारंटाईन कक्ष स्थापनआरोग्य यंत्रणेने एखाद्या कैद्याला कारागृहातच क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्यास तशी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक नव्या कैद्यात सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव, श्वसनास त्रास आदी लक्षणे असल्यास आरोग्य तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. क्वारंटाइन कक्षात अद्याप एकही कैदी नाही.‘लॉकडाऊन’च्या काळात येणाऱ्या सर्वच कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले आहे. जुन्या कैद्यांसोबत नव्या कैद्यांचा काहीही संपर्क नाही. नव्या कैद्यांची दिनचर्या वेगळी आहे. तसे वरिष्ठांचे आदेश आहेत.- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती

टॅग्स :Policeपोलिस