शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीतील 'डीप्टी' होण्यासाठी आता नवे 'फिल्टर' लागणार, निकष अधिक कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:06 IST

Amravati : महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पदांवर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आणि खात्यांतर्गत पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने नव्याने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्रपोलिस दलातील वरिष्ठ पदांवर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आणि खात्यांतर्गत पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने नव्याने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त यांसारख्या 'अ' दर्जाच्या पदांसाठी आता शैक्षणिक पात्रतेसोबतच शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रशिक्षणाचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. १९ जानेवारी रोजी गृह विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, यामुळे पोलिस प्रशासनात मोठे बदल होणार आहेत. ते नवे सेवाप्रवेश नियम २०२६ राज्यातील सर्व पोलिस घटकांनादेखील माहितीसाठी पाठविण्यात आले आहेत.

यानुसार, पोलिस उपअधीक्षक किंवा सहायक पोलिस आयुक्त या पदांसाठी ३० टक्के जागा थेट स्पर्धा परीक्षेद्वारे भरल्या जातील, तर ७० टक्के जागा अनुभवी पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीतून भरल्या जाणार आहेत. थेट भरतीसाठी उमेदवाराला कोणत्याही शाखेची पदवी असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे ही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांची उंची किमान १६५ सेंटीमीटर आणि छाती न फुगवता ८४ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी किमान १५७सेंटीमीटर उंचीचा निकष लावला आहे.

सीपीटीपी बंधनकारक

केवळ परीक्षा उत्तीर्ण होऊन चालणार नाही, तर नियुक्तीनंतर उमेदवारांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 'सीपीटीपी' यशस्वीपणे पूर्ण करावा लागेल. जर कोणी या प्रशिक्षणात किंवा त्यानंतरच्या विभागीय परीक्षांमध्ये अपयशी ठरले, तर त्यांची सेवा समाप्त केली जाऊ शकते किंवा ते पुढील पदोन्नतीसाठी अपात्र ठरू शकतात.

लहान कुटुंब हा निकषही सक्तीचा

कौटुंबिक जबाबदारीचे भान राखण्यासाठी लहान कुटुंब हा निकषही सक्तीचा करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांना दोनपेक्षा अधिक अपत्ये असतील, ते शासकीय सेवेसाठी अपात्र ठरतील. या नव्या नियमांमुळे राज्यातील पोलिस दलात केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षमच नव्हे, तर शारीरिक आणि प्रशासकीयदृष्ट्या उत्तम अधिकारी मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tougher Criteria for Maharashtra Police Deputy Posts: New Rules

Web Summary : Maharashtra introduces stricter criteria for police deputy posts. Physical fitness, training, and family size are now key. Direct recruitment fills 30%, promotions 70%. CPTP training mandatory; failure leads to termination. Small family norm enforced.
टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती