शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फसवणुकीचा नवा फंडा! जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने QR कोडचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:09 IST

पोलिस ठाण्यात धाव : तक्रारी वाढण्याची अधिक शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावाने बनविण्यात आलेल्या फेक अकाउंटमुळे चांदूरबाजार तालुक्यातील एका तरुणाला ६२ हजार रुपयांचा फटका बसला. ते फेक अकाउंट डीअॅक्टिव्हेट होण्यापूर्वीच तो प्रकार घडल्याचे सोमवारी दुपारी स्पष्ट झाले. आपल्या मुलाची फसवणूक झाल्याचे समजताच त्याच्या आईने अमरावती शहर गाठले. तिला तक्रारीसाठी चांदूरबाजार पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.

सायबर भामट्याने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे कार्यालयातील खुर्चीवर बसलेले छायाचित्र असलेले एक फेक अकाउंट फेसबुकवर तयार केले. त्या अकाउंटवरून त्या आरोपीने २२ जून रोजी अनेकांना 'हाय' असा मॅसेज केला. त्यावर रिप्लाय देणाऱ्यांना सायबर भामट्याने आपण जिल्हाधिकारीच बोलत असल्याचे भासवले.

माझे संतोषकुमार नामक चांगले मित्र आहेत, ते सीआरपीएफला अधिकारी आहेत. त्यांची आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील जुने फर्निचर विकायचे आहे. तुम्हाला घ्यायचे असेल तर मी त्यांना तुमच्यासोबत बोलायला सांगतो. तसेच त्यांचा मोबाइल क्रमांक तुम्हालासुद्धा देतो आहे, असे मॅसेज करून संतोषकुमार नाव लिहिलेला एक मोबाइल क्रमांक पाठवला. मॅसेजला रिप्लाय देणाऱ्या प्रत्येकाला त्या आरोपीने अशाचप्रकारे मॅसेज केले. 

चांदूरबाजार तालुक्यातील मुलगा भुललाच; तक्रार प्रक्रियेत

  • चांदूरबाजार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुलानेसुद्धा त्या मॅसेजला रिप्लाय दिला. त्यावर त्याला फर्निचर खरेदी करण्यासाठी आरोपीकडून एक क्यूआर कोड पाठविण्यात आला.
  • हा क्यूआर कोड आल्यानंतर त्या मुलाने सुरुवातीला ५५ हजार, नंतर ५ हजार व शेवटी २ हजार अशा पद्धतीने एकूण ६२ हजार रुपये पाठवले. मात्र काही वेळाने हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे समोर आले.
  • दरम्यान, या प्रकरणी फसवणूक झालेल्या मुलाच्या आईने सोमवारी ग्रामीण पोलिसांचे सायबर पोलिस ठाणे गाठून या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणात तक्रारीवरून चांदूर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावती