शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

श्वान निर्बीजीकरण निव्वळ कागदोपत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:37 IST

व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल व लक्ष्मी इन्स्टिट्यूटद्वारे नऊ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा पशुवैद्यकीय विभागाचा दावा चौकशी समितीने फेटाळला आहे. एका दिवशी कमाल १० ते १२ शस्त्रक्रिया अपेक्षित असताना नऊ हजार शस्त्रक्रिया निव्वळ कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष समितीने काढला.

ठळक मुद्देबोंद्रेंची विभागीय चौकशी : समितीचे धक्कादायक निष्कर्ष

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल व लक्ष्मी इन्स्टिट्यूटद्वारे नऊ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा पशुवैद्यकीय विभागाचा दावा चौकशी समितीने फेटाळला आहे. एका दिवशी कमाल १० ते १२ शस्त्रक्रिया अपेक्षित असताना नऊ हजार शस्त्रक्रिया निव्वळ कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष समितीने काढला.अनियमिततेला दोषी सहायक पशुशल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांची विभागीय चौकशी (डीई) करण्याचा स्वयंस्पष्ट अभिप्राय चौकशी समितीचे ्रज्येष्ट सदस्य तथा अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिला आहे. चौकशी समितीने अत्यंत वस्तुनिष्ठ निष्कर्ष नोंदविल्याने आयुक्तांची याबाबतची भूमिका निर्णायक ठरणार आहे. प्रशासनाने प्रचंड गोपनीय ठेवलेला हा चौकशी अहवाल ‘लोकमत’च्या हाती लागला असून, त्यात नोंदविण्यात आलेल्या निष्कर्षाचा विचार केल्यास, लाखो रुपयांच्या अनियमिततेवर समितीने शिक्कामोर्तब केले आहे. शेटे यांनी याबाबतचा चौकशी अहवाल २२ फेब्रुवारीला आयुक्तांकडे सुपूर्द केला. मात्र, प्रशासनाने तब्बल महिनाभर त्याबाबत वाच्यता केली नाही, यावरून या अहवालात बोंद्रे यांच्यावर ठेवण्यात आलेला अनियमिततेचा ठपका आणि या प्रकरणातील गांभीर्य या बाबी लक्षात घेण्याजोग्या आहेत.शहरात मोकाट श्वानांचा मुक्त हैदोस असताना तब्बल नऊ हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचा दावा बोेंद्रे यांनी केला होता. मात्र, तो दावा कुणाच्याही पचनी पडला नाही. विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी त्यावर जाहीर टीकास्त्र सोडत चौकशीची मागणी केली. ‘लोकमत’ने ही नियमितता व त्यामागील सूत्रधारांची नावे उघड करत हा मुद्दा रेटून धरला. परिणामी आयुक्त हेमंत पवार यांनी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी सहा सदस्यीय समिती गठित केली. त्यात अतिरिक्त आयुक्तांसह मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त योगेश पिठे व सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांचा समावेश होता. यात सीसीटीव्ही फुटेज पाहून निर्बीजीकरण झाले किंवा कसे, संख्या किती, याचा वस्तुनिष्ठ ऊहापोह डेंगरे यांनी केला. समिती सदस्यांनी तब्बल चार महिन्यानंतर का होईना, याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्त हेमंत पवार यांच्याकडे सोपविला.असे आहेत निष्कर्ष

- दरदिवशी १० ते १२ शस्त्रक्रिया अभिप्रेत असताना कागदोपत्री दररोज १०० ते २२५ शस्त्रक्रिया दाखविण्यात आल्या.शस्त्रक्रिया करण्यासाठी अप्रशिक्षित मजुरांचा वापर केल्याने त्या शस्त्रक्रिया योग्य झाल्यात की नाही, हे निश्चित करता येत नाही.- श्वानांना भूल न देता शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आल्या नाहीत.- सीसीटीव्हीचे फु टेज असंबद्ध आहेत, ते तारीखनिहाय नाहीत. जे आहेत, ते अत्यंत फुटकळ आहेत. फुटेजचा संपूर्ण डाटा उपलब्ध करून देण्यात आला नाही.- नऊ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्यात, असा दावा पशुशल्य विभागाकडून झाला असला तरी प्रत्यक्षात दोन्ही संस्थांनी ११ हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्याची नोंद या विभागाकडे आढळून आली आहे.- शस्त्रक्रियेसाठी एकापेक्षा अधिक पशुशल्यचिकित्सकाची मदत घेतल्याची नोंद नाही, तर रोजच्या १०० पेक्षा अधिक श्वानांवर शस्त्रक्रिया कशा?- सीसीटीव्हीमधील डेटा विस्कळीत आणि अस्ताव्यस्त स्वरूपाचा.श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसंदर्भातील चौकशी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. त्या अनुषंगाने सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर विभागीय चौकशी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- हेमंत पवारआयुक्त, महापालिका