शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Video: राणांच्या घरावर दगड फेकणारा शिवसैनिक कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 16:05 IST

आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबईत अटक झाल्यानंतर अमरावती येथील राणा यांच्या निवास्थानी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गोळा झाले होते.

अमरावती/मुंबई - हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणचा हट्ट धरला होता. त्यामुळे, मुंबई आणि अमरावती येथील शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेरच गर्दी केली. राणा दाम्पत्यास खार येथील निवासस्थानातून बाहेरच पडू दिले नाही. दुसरीकडे अमरावती येथील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. आता, येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबईत अटक झाल्यानंतर अमरावती येथील राणा यांच्या निवास्थानी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गोळा झाले होते. राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचवेळी, पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात झटापट झाली होती. या गोंधळात एका शिवसैनिकाने राणा यांच्या अमरावतील घरावर दगडफेक केली होती. आता, या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील एका सीसीटीव्हीमध्ये हा शिवसैनिक कैद झाला असून तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी आपल्या घरावर दगडफेक झाल्याचा आरोपही केला होता. मात्र, तेव्हा दगडफेक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं. 

मातोश्री आमच्यासाठी मंदिर आहे. त्या मंदिराकडे बोट दाखवणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना प्रसाद देणारच, असा इशारा मातोश्रीबाहेरील महिला शिवसैनिकांनी दिला होता. त्यावरुन, चांगलंच तापलं होतं. अखेर राणा दाम्पत्यास पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवसैनिक शांत झाले होते. मात्र, अटकेनंतर नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. 

पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ

ठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहे. दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पित असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

२९ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोघांनाही आता २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. राणा दाम्पत्यानं जामीनाच्या प्रयत्नांसाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या याचिकेवर २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असं सत्र न्यायालयानं म्हटलं. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाMumbaiमुंबईAmravatiअमरावती