शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

By गणेश वासनिक | Updated: May 12, 2025 14:04 IST

Amravati : मुंबईच्या खार पोलिसात तक्रार दाखल, ‘तू हिंदू शेरनी आहे’ आता तुला आम्ही काही दिवसात संपवून टाकणार

गणेश वासनिकअमरावती : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे. भारताकडून ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सिंदूरचा उल्लेख करत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा या सध्या मुंबईत आहेत. रविवारी मध्यरात्री त्यांना पाकिस्तानमधील वेगवेगळ्या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून हे कॉल आले आहेत.

‘ना सिंदूर राहील, ना सिंदूर लावणारी’ तुझी सर्व माहिती आमच्याकडे आहे. तू हिंदू शेरनी आहे. आता तुला आम्ही काही दिवसात संपवून टाकणार आहे. त्यामुळे ना सिंदूर राहणार ना सिंदूर लावणारी, अशी धमकी पाकिस्तानातून आलेल्या कॉलवर नवनीत राणा यांना देण्यात आली आहे. 

खार पोलिस ठाण्यात तक्रार थेट पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने नवनीत राणा यांनी मुंबईतील खार पोलीस ठाणे गाठले आहे. तर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली आहे. याबाबत काही वेळात सविस्तर माहिती दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवनीत राणा यांना वाय दर्जाची सुरक्षानवनीत राणा या अमरावतीच्या खासदार असताना त्यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता काही महिन्यांपूर्वी हैदराबाद येथून एका पत्राद्वारे त्यांना धमकी देण्यात आली होती. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. पाकिस्तानातून मिळालेल्या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्यात आली. खार पोलिस ठाण्यात तक्रार देताना नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती रवी राणा हेदेखील उपस्थित आहेत.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावतीPakistanपाकिस्तान