लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची साखरपेरणी जिल्ह्यात सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी २०१४ मधील राकाँच्या उमेदवार नवनीत राणा यांनी तब्बल १५ मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले, तर राष्ट्रवादी काँग्रसमध्ये खळबळ उडाली आहे.निर्धार परिवर्तनाचा या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते बुधवारी जिल्ह्यात उपस्थित होते. अचलपूर येथे दुपारी व अमरावती येथे सायंकाळी सभेच्या निमित्ताने लोकसभेचा माहोल तयार करण्यावर या नेत्यांचा भर आहे. या पार्श्वभूमीवर मागील निवडणुकीतील राकाँच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याशी संवाद साधाणार काय, यावर चर्चा सुरू असतानाच बुधवारी नेत्यांच्या निमंत्रणावरून नवनीत राणा यांनी या बड्या नेत्यांची वºहाडे यांच्या घरी भेट घेतली. यावेळी तब्बल १५ मिनिटे त्यांनी अजित पवार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी मला निवडून आणण्याकरिता खूप मेहनत घेतल्याचे सांगत नवनीत रवी राणा यांनी पवार यांचे आभार मानले. यावेळी माजीमंत्री अनिल देशमुख, माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराती, जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे उपस्थित होते. ‘अतिथी देव भव’ ही अंबानगरीची संस्कृती आहे. त्याप्रमाणे अजित पवार व जयंत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे हे माझे कर्तव्य असल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांना सांगीतले.
नवनीत राणा यांची अजित पवारांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:58 IST
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची साखरपेरणी जिल्ह्यात सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी २०१४ मधील राकाँच्या उमेदवार नवनीत राणा यांनी तब्बल १५ मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली.
नवनीत राणा यांची अजित पवारांशी भेट
ठळक मुद्देराजकीय खळबळ : विविध विषयांवर १५ मिनिटे चर्चा