शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'नारायण राणे हे शिवसेनेचे प्रॉडक्ट, स्टंट बाजी-नौटंकी करणे हा त्यांचा जुना धंदा'; कृषीमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 21:34 IST

'उद्धव ठाकरेंबद्दल काहीतरी बोलायचं आणि भाजपशी जवळीक साधायची, एवढ्यावरच नारायण राणेंचा राजकीय प्रवास थांबला.'

अमरावती : भाजपचे उदोउदो करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेचे प्रॉडक्ट आहे. त्यांचा राजकीय जन्मदेखील सेनेतूनच झाला आहे, हे कदापिही विसरू नये. स्टंटबाजी आणि नौटंकी करणे हा राणेंचा जुनाच धंदा, हे आम्हालाही माहिती आहे, असा टाेला राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अमरावती येथे रविवारी लगावला.

दादाजी भुसे हे शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ विभागीय कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून उपस्थित झाले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गत काही दिवसांपूर्वी ‘माताेश्री’वरील चार जणांवर लवकरच केंद्रीय यंत्रणांकडून नोटीस बजावली जाईल, असे भाकीत वर्तविले होते, या पार्श्वभूमीवर भुसे यांना विचारणा केली असता त्यांनी नारायण राणे यांची ओळख शिवसेना आहे, हे विसरू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबद्दल काहीतरी बोलायचे आणि भाजपशी जवळीक साधायची एवढ्यावरच नारायण राणेंचा राजकीय प्रवास थांबला, असेही भुसे म्हणाले.

आमदार संजय राठोड यांच्याबाबतचा निर्णय लवकरचमाजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील वापसीबाबत बोलताना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी राठोड यांचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच घेतील, असे संकेत दिलेत. आमदार संजय राठोड हे सेनेचे जिल्हाप्रमुख, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. ते अगोदर शिवसैनिक असून, त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असे भुसे म्हणाले. दरम्यान, आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळातील वापसीबाबत विचारले असता ‘नो कॉमेंट्स’ असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Amravatiअमरावती