शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणीय बदलात नंदुरबार, धुळे, बुलडाणा अतिसंवेदनशील; ‘टेरी’चा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:24 IST

वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी युके मेट आॅफिस, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने सन २०७० पर्यंतच्या वातावरणीय बदलांच्या अनुमानाचा अभ्यास करून वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह्यांची यादी निश्चित केली आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी युके मेट आॅफिस, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने सन २०७० पर्यंतच्या वातावरणीय बदलांच्या अनुमानाचा अभ्यास करून वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह्यांची यादी निश्चित केली आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे व बुलडाणा जिल्हा पहिल्या तीन क्रमांकावर  असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.जागतिक वातावरणबदलामुळे राज्यातील तापमानातदेखील वाढ झाली. यामुळे पर्जन्यमान व उष्णता निर्देशांकात बदल होत आहे. राज्यात सन २०३०, सन २०५० व सन २०७० या कालखंडात वाढते तापमान, आर्द्रतेमधील बदलांमुळे  पिकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे. अनियमित पावसाचे वातावरण पिकांवर रोगराई वाढण्यास कारणीभूत ठरेल. डासांच्या प्रजननामुळे होणाºया रोगांमध्ये वाढ होणार आहे. बदलणाºया वातावरणामुळे पिकांची तग धरण्याची शक्ती कमी होणार आहे.  या संभाव्य संवेदनशील निर्देशांक ( व्हर्नेबिलिटी इंडेक्स) नुसार वातावरणीय बदलास राज्यातील नंदुरबार जिल्हा सर्वाधिक संवेदनशील आहे. याखालोखाल धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांचा क्रम अहवालात नमूद आहे. समुद्र किनारे, जंगले, आरोग्य, पाण्याचे स्रोत, जैवविविधता आदींवर वातावरणीय बदलांच्या अनुकूलनासाठी (अ‍ॅडॉप्टेशन) व बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी (मीडिटेशन) पर्यावरण विभागाने व्यापक धोरण तयार केले आहे.

या आहेत महत्त्वाच्या शिफारशी* नदीच्या उगमस्थानापासून जंगलांचे रक्षण करणे. त्रिस्तरीय वनांमुळे पावसाचे पाणी मुरण्याची डोंगराची क्षमता वाढून पुराची तीव्रता कमी होईल. वर्षभर नदी प्रवाहित राहून भुजल पातळी अबाधित राखण्यास मदत होणार आहे.* बदलत्या वातावरणात तग धरणा-या पिकांच्या व फळांंच्या प्रजातीच्या संशोधनास व लागवडीस प्रोत्साहन देणे. पारंपरिक पिकांचे संवर्धन करणे. उपजीविकेच्या पर्यायी संसाधनास प्रोत्साहन देणे* वातावरणीय बदलास पूरक गावांच्या निर्मितीवर भर देणे. जनसहभागातून पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, गावतळे, वनराई आदी योजनांचा विकास करणे. सागर किनारी कांदळवनांचे व कोरलचे संवर्धन करणे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र