शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मित्रा’ योजनेंतर्गत नांदगावला टेक्सटाइल पार्क! देवेंद्र फडणवीस, जिल्हा कृषी महोत्सवाच्या समारोपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 19:23 IST

कापूस, कापड ते फॅशन हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये टेक्सटाइल झोनची निर्मिती करण्यात आली.

गजानन मोहोडअमरावती :

कापूस, कापड ते फॅशन हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये टेक्सटाइल झोनची निर्मिती करण्यात आली. आता केंद्र शासनाच्या ‘मित्रा’ योजनेंतर्गत नांदगावला टेक्सटाइल पार्क होण्यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे ‘माविम’ व ‘कारितास इंडिया’ यांच्या सहकार्याने आयोजित प्राकृतिक कृषी, मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी उपस्थित होते.

जलयुक्त शिवारमुळे राज्यात ३६ लाख हेक्टर शेती रब्बी पिकाखाली आली. आता नव्याने जलयुक्त-२ सुरू करीत आहोत. याशिवाय ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेती’ अभियानदेखील सुरू करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रास्ताविक किसनराव मुळे, सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर व आभार अनिल खर्चान यांनी मानले.जिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉलजिल्ह्यात बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉल तयार करण्यात येईल. याद्वारे बचत गटांना बाजारपेठ व नागरिकांना दर्जेदार पदार्थ उपलब्ध होतील. येथे फिरत्या पद्धतीने जागा मिळेल. याशिवाय वऱ्हाडी खाद्यसंस्कृती मुंबईतदेखील रुजावी यासाठी मुंबई, पुण्यात महोत्सव आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस