शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-औरंगाबाद महामार्ग चार तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2022 20:36 IST

Amravati News गुरुवारी नागपूर-औरंगाबाद महामार्ग बोरगाव धांदे-भातकुली या टप्प्यात चार तास बंद होता.

अमरावती : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी नागपूर-औरंगाबाद महामार्ग बोरगाव धांदे-भातकुली या टप्प्यात चार तास बंद होता. तालुक्यातील बगाजी सागर धरणाचे पाणी सोडल्यामुळे बारा गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद आतापर्यंत धामणगाव रेल्वे तालुक्यात झाली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या तालुक्यात पूरस्थिती कायम आहे. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्पाचे दरवाजे बुधवारी २६० सेंटिमीटरने उघडण्यात आले. त्यानंतर गुरुवारी बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे १०० सें.मी.पर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील १२ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. बोरगाव धांदे-भातकुली या मार्गावर असलेल्या निचोड नाल्याला पूर आल्यामुळे औरंगाबाद-नागपूर हा महामार्ग तब्बल चार तास बंद होता.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात २४०० वर घरांची पडझड

भंडारा/ गोंदिया : दाेन दिवस झालेल्या अतिवृष्टीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत २४०० वर घरांची पडझड झाली असून, भंडारा जिल्ह्यातील ३८ मार्ग तिसऱ्या दिवशीही बंद झाल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र दाणादाण उडाली असून, अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली हाेती. पुराचा २५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला. २०० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

गत २४ तासांत १९.७ मिमी पावसाची नाेंद झाली. पावसाने बुधवारी रात्रीपासून उसंत घेतल्याने सर्वांना माेठा दिलासा मिळाला. मात्र, दाेन दिवस झालेल्या पावसात जिल्ह्यातील ८७० घरांची पडझड झाली, तर जनावरांचे ६६ गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. लागवड झालेल्या एक लाख ७३ हजार ७८० हेक्टर क्षेत्रापैकी अतिवृष्टीचा फटका ४५५ गावांतील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान धान पिकाचे झाले आहे.

नदीनाल्याचे पाणी वस्तीत शिरल्याने जिल्ह्यातील २०० वर कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. सर्वाधिक माेहाडी तालुक्यातील ९७ कुटुंबांचा समावेश आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग बंद असून, गुरुवारी ३८ मार्ग बंद पडले हाेते. दरम्यान, वैनगंगेने धाेक्याची पातळी बुधवारी रात्री ओलांडली हाेती. गुरुवारी दुपारनंतर पूर ओसरायला लागला. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

गोंदिया जिल्ह्यात दीड हजारावर घरांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यांतील दहा ते बारा गावांमध्ये पुराचे पाणी शिरले, तर अनेक नाल्यांच्या पुलावरून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पाणी वाहत होते. त्यामुळे दहा ते बारा मार्ग बंद होते. पुरामुळे हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली असल्याने ती सडण्याची शक्यता बळावली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अतिवृष्टीमुळे नवेगावबांध, बोदलकसा जलाशय ओव्हर फ्लो झाले, तर पुजारीटोला, कालीसरार, संजय सरोवर या धरणाचे पाणी सोडल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे.

वैनगंगेला पूर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद आहेत. त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.

गुरुवारी पावसाने उसंत घेतली. मात्र, इटियाडाेह व संजय सराेवराचे पाणी साेडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे तिच्या उपनद्यांना दाब येऊन जिल्ह्याच्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राणहिता व गाेदावरी नदीलाही पूर आला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे गडचिराेली-मूल हा मार्ग वगळता सर्वच प्रमुख मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची माेठी अडचण झाली आहे. शेकडाे हेक्टर शेतात पाणी शिरले आहे.

११ भंडारा- भंडारा शहरातील ग्रामसेवक काॅलनीत बुधवारी सकाळी वैनगंगेच्या पुराचे पाणी शिरले होते.

टॅग्स :floodपूर