शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

दिवाळीपूर्वीच फुटणार नगरपंचायतींचे फटाके

By admin | Updated: September 30, 2015 00:29 IST

जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव व धारणी या नवनिर्मित नगरपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राजकीय हालचालींना वेग : नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षाअमरावती : जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव व धारणी या नवनिर्मित नगरपंचायतींची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असले तरी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. नगरपंचायत निवडणुकीमुळे यंदा मात्र दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार आहेत.जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत स्थापनेचा निर्णय गतवर्षी आघाडी सरकारने घेतला होता. परंतु जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारच्या काळात झाली. ९ एप्रिल रोजी नगरपंचायतींची अधिसूचना जारी होऊन ग्रामपंचायती बरखास्त झाल्यात. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांनी सहा महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रियेची तयारी करावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले होते. त्या अन्वये आॅगस्ट महिन्यात प्रभागरचना व आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. साधारणपणे ५०० मतदारसंख्येचा एक प्रभाग असे १७ प्रभाग प्रत्येक नगरपंचायतीमध्ये जाहीर करण्यात आले. तेव्हापासूनच येथे राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. प्रभाग आरक्षणनिहाय उमेदवारांचा शोध घेणे, राखीव प्रभागातील उमेदवारांचे जात, वैधताप्रमाणपत्र काढणे या सोपस्कारांना गेल्या महिन्यापासून गती मिळाली आहे. नगरपंचायती स्थापित झाल्यापासून प्रामुख्याने युवा उमेदवार बाशिंग बांधून आहेत. अपक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रथमच निवडणूक होणारी नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत. (प्रतिनिधी)आरक्षण गुलदस्त्यात नगरपंचायतींमध्ये १७ प्रभाग आहेत. या प्रभागांची आरक्षण प्रक्रिया मागील महिन्यात पार पडली. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांद्वारा उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप गुलदस्त्यात असल्याने इच्छुक उमेदवारांना मात्र प्रतीक्षा करावी लागत आहे.संकेतस्थळावरील अर्जाने उडणार तारांबळमहाआॅनलाईनद्वारे विकसित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज व शपथपत्रे सादर करावी लागणार आहेत. ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा बोजवारा जगजाहीर असल्याने उमेदवारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना या ‘सर्व्हर डाऊन’चा फटका बसला होता. अखेर आयोगाने पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारले होते. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाविषयी अद्याप कुठल्याही सूचना नाहीत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकी पश्चात आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.- विजय लोखंडे,प्रशासक, तिवसा नगरपंचायत.