शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांची सुपारी... आणि एका लिपिकाचा रक्तरंजित मृत्यू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:37 IST

आर्थिक व्यवहारातून हत्येचा संशय : तीन विधिसंघर्षित बालके ताब्यात, क्राईमची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका शाळेत कार्यरत वरिष्ठ लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणाच्या मास्टरमाइंड असलेल्या फरार आरोपीने सुमारे दीड लाख रुपयांमध्ये त्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती चौकशीअंती पुढे आली आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास बडनेरा रेल्वेस्थानक ते तिलकनगर मार्गावर रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत आढळला होता. अतुल ज्ञानदेव पुरी (वय ५०, रा. पुंडलिकबाबा नगर) अशी मृताची ओळख पटविण्यात आली होती. या हत्येला आर्थिक व्यावहारिक वादाची किनार असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र अद्यापही मास्टरमाइंड हाती आला नसल्याने खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हत्या प्रकरणात दोन युवकांना अटक केली. तर, तीन विधिसंघर्ष बालकांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. साहिल ऊर्फ गोलू हरी मोहड (१९, रा. आदिवासी कॉलनी), सक्षम विजय लांडे (१९, रा. सावंगा गुरव, नांदगावखंडेश्वर, ह. मु. व्यंकय्यापुरा, अमरावती), अशी अटक दोघांची नावे आहेत. खून करताना या दोघांसोबत एक विधिसंघर्षित बालकही होता. अतुल पुरी यांचा खून केल्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी अन्य दोन विधिसंघर्ष बालकांनी मदत केली. त्यामुळे एकूण तीन विधिसंघर्ष बालकांना आतापर्यंत चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आर्थिक व्यवहारातून अतुल पुरी यांच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली. सुपारी देणाऱ्या मास्टरमाइंडचा चेहरा उलगडला असला तरी त्याच्या अटकेनंतर हत्येचे कारण स्पष्ट होईल, असे शिंदे म्हणाले. 

मास्टरमाईंडच्या शोधार्थ पथके रवानाअतुल पुरी यांच्याविरूद्ध गतवर्षी फ्रेजरपुरा पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल होता. त्यात त्यांना अटक देखील झाली होती. ती घटनादेखील आर्थिक व्यवहारातून घडली होती. त्यामुळे पुरी यांचा खून सुपारी देऊन करवून घेतल्याचे उघड झाले असले तरी कारण मात्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी जुन्या प्रकरणाचे धागेदोरे जुळविण्याकडे लक्ष वळविले आहे.

कारंजा लाडला पळाले२२ ऑगस्ट रोजी सकाळी अतुल पुरी हे बडनेरा रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने जात होते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या तिघांनी पाठलाग करून अडवून त्यांची हत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले होते. ते तिघेही मारेकरी वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे निघून गेले होते. त्यांना गुन्हे शाखेने कारंजालाड येथून अटक करून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षकत्रयी अमोल कडू, महेश इंगोले व अनिकेत कासार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती