तरूणाचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:01:03+5:30

तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी मोहंमद आबीद मोहंमद हारूण (२०, रा. कालीमाता झोपडपट्टी, परतवाडा) हा असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्याला अटक करण्यात आली. त्याने खुनाची कबुली दिली. आरोपीने रामू यास खापरखुंडी शिवारात नेऊन त्याचेजवळ पैसे असतील म्हणून त्याच्याजवळील दुपट्ट्याने गळा आवळून खून केला.

Murder on the throat of a young man | तरूणाचा गळा आवळून खून

तरूणाचा गळा आवळून खून

Next
ठळक मुद्देआरोपीस अटक । मृत बैतुल जिल्ह्यातील डोडाजामचा रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : चोरीच्या प्रयत्नात एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना येथील बिच्छन नदीपात्रात शनिवारी उघड झाली. रामू मोंग्या जामूनकर (२०, रा. डोडाजाम, ता. भैसदेही, जि. बैतुल) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मो.आबिर मो. हारुण (२०, कालंकामाता झोपडपट्टी, परतवाडा) याला अटक करून त्याचेविरुद्ध हत्या व हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी सईदखाँ वल्द मोहंमद खाँ यांनी २८ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा सलीम हा शेळी चारण्याकरिता बिच्छन नदीचे खापरखुंडी शिवारात गेला असता त्याला बिच्छन नदीच्या पात्रात एक अनोळखी मृतदेह दिसल्याच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांनी अनोळखी मृताची ओळख पटविण्यात यश मिळवून तो रामू मोंग्या जामूनकर असल्याचे निष्पन्न झाले. मृत युवक कोठून आला? नदीपात्राकडे कसा गेला, त्याला तिकडे नेले कुणी व काय, याबाबत पोलिसांनी तपास केला असता मृताला जीवाने ठार मारून त्याचे प्रेत लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले.
तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी मोहंमद आबीद मोहंमद हारूण (२०, रा. कालीमाता झोपडपट्टी, परतवाडा) हा असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्याला अटक करण्यात आली. त्याने खुनाची कबुली दिली. आरोपीने रामू यास खापरखुंडी शिवारात नेऊन त्याचेजवळ पैसे असतील म्हणून त्याच्याजवळील दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. प्रेत लपवून त्याचे मोबाईल नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी आता भादंविच्या कलम ३०२, २०१, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी. जे. अबदागिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे पथकातील एपीआय अभिजित अहिरराव, नीलेश करंदीकर, महादेव भालेराव, एएसआय मोहन मोहोड, पोलीस काँस्टेबल प्रमोद चौधरी, पिंटू बावनेर, अशोक दहिकर, जयसिंग चव्हाण, श्रीकांत वाघ, दीपक राऊत, कमलेश मुराई, मंगेश श्रीराव यांनी केली आहे.

दरोड्याच्या तपासाचे काय?
बिच्छन नदीपात्रालगत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आठवडाभरात परतवाडा पोलिसांनी आरोपीला गजाआड क ेले. ही कामगिरी उत्तमच आहे. मात्र ६ मे रोजी मुख्य मार्गावरील कश्यप पेट्रोलपंपानजिक राहणाऱ्या विवेक अग्रवाल यांच्या घरी पडलेल्या दरोडयाचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. २० लाख ७८ हजार रुपयांचा तो दरोडा परतवाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. चार महिने होत असताना आरोपी न गवसणे, हे परतवाडा पोलिसांचे मोठे अपयश असल्याची टीका होत आहे. एकीकडे ईश्वर पन्नालाल अग्रवाल ज्वेलर्समधील आरोपी चार दिवसांमध्ये मिळालेत. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन पाठही थोपटून घेतली. मात्र, २१ लाखांच्या दरोड्याबाबत स्थानिक पोलीस चकार शब्द काढायला तयार नाहीत.

Web Title: Murder on the throat of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून