शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निर्घृण खून केला अन् मृतदेह फरफटत नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 12:35 IST

पंकज हा तीन दिवसांपूर्वी त्याच्या घरामागील स्वतःकडील खताच्या गंजीवर लघुशंका करीत असताना राजेश ऊर्फ खन्ना याने मनाई केली. यातून त्यांचात वाद झाला होता, वाद निवळला तरी राजेशच्या मनात खुमखुमी कायम होती.

ठळक मुद्देचिंचोली खुर्द येथे युवकाची हत्यातीन दिवसांआधीच्या वादाचा वचपा

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली खुर्द येथे तीन दिवसांपूर्वी स्वत:कडील खताच्या गंजीवर लघुशंका करण्याची बाब युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याला लोखंडी ॲंगलने डोक्यावर वार करून ठार करण्यात आले.

पोलीस सूत्रांनुसार, पंकज जगत खंडारे (३५, रा. चिंचोली खुर्द) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी घराशेजारी राहणारा राजेश ऊर्फ खन्ना देविदास खंडारे (४५) याला रहिमापूर पोलिसांनी अटक केली. पंकज हा तीन दिवसांपूर्वी त्याच्या घरामागील स्वतःकडील खताच्या गंजीवर लघुशंका करीत असताना राजेश ऊर्फ खन्ना याने मनाई केली. यातून त्यांचात वाद झाला होता, वाद निवळला तरी राजेशच्या मनात खुमखुमी कायम होती. ७ डिसेंबर रोजी पंकज कामावरून घरी आला. बाहेर निघाल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर पंकजच्याच घरामागील जागेत राजेशने लोखंडी अँगलने त्याच्या डोक्यावर सपासप वार केले. या मारहाणीत पंकजचा डोके चेंदामेंदा होऊन मेंदू बाहेर पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

कोसळलेल्या पंकजला राजेशने फरफटत गावानजीकच्या शहानूर नदीपात्रात नेले. या घटनेची माहिती कळताच पंकजची आई कोकिळाबाई खंडारे (५०) यांनी नदीपात्र गाठले. यावेळी पंकज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर मारेकरी राजेश ऊर्फ खन्ना त्याच्या शेजारी उभा होता. यानंतर राजेशने तेथून पळ काढला.

घटनेची माहिती रहिमापूर चिंचोली पोलीस ठाण्याला मिळताच ठाणेदार सचिन इंगळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पंकजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

पोलिसांनी आरोपी राजेशला शोधून रात्री दोन वाजता ताब्यात घेतले. कोकिळाबाई खंडारे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी गजानन वर्मा, नीलेश टोपे, गजानन शेरे, रवींद्र निंबाळकर, नागोराव जवळकर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू