जबरी चोरीनंतर अपंग वृद्धेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:45 AM2018-11-19T00:45:06+5:302018-11-19T00:46:13+5:30

वलगाव रोडवरील हजरत बिलालनगरातील एका घरात रविवारी दुपारी जबरी चोरीनंतर वृद्ध महिलेची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचा अडीचशे ग्रॅ्रमचा ऐवज व ८३ हजारांची रोकड लंपास झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

The murder of a crippled old man after theft | जबरी चोरीनंतर अपंग वृद्धेची हत्या

जबरी चोरीनंतर अपंग वृद्धेची हत्या

Next
ठळक मुद्देहजरत बिलालनगरात भरदुपारची घटना : सात लाखांचा ऐवज लंपास

तोंड दाबून गळा आवळला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वलगाव रोडवरील हजरत बिलालनगरातील एका घरात रविवारी दुपारी जबरी चोरीनंतर वृद्ध महिलेची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचा अडीचशे ग्रॅ्रमचा ऐवज व ८३ हजारांची रोकड लंपास झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ताहेरा बानो अदील अहमद (६०, रा. हजरत बिलालनगर) असे मृताचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी रात्री ८ च्या सुमारास अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९२ (लुटपाट), ३९४ (जबरी चोरी), ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा नोंदविला. वलगाव रोडवर मीठ कारखान्यामागे हजरत बिलालनगरात ताहेरा बानो या पती हाजी अदील अहमद यांच्यासोबत वास्तव्यास होत्या. हे दाम्पत्य अपंग आहे. दोन्ही मुलींच्या लग्नानंतर घरात दोघेच होते. अदील यांची पुतणी सौदी अरबला जाणार असल्याने पाहुणचाराच्या तयारीला ताहेरा बानो लागल्या होत्या. अदील हे घरापासून काही अंतरावरील रेशन दुकान सांभाळत होते.
रात्री उशिरा शवविच्छेदन
अदील यांच्याकडे घरकाम करणारी नुसरत परवीन शेख अब्रशर (४५, रा. धरमकाटा) कामासाठी दुपारी १.३० वाजता गेली असता, तिला ताहेरा बानो फरशीवर पालथ्या पडलेल्या दिसल्या. त्यांच्या नाकातोंडातून रक्त निघत होते. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ अदील यांना दिली. घटनेच्या माहितीवरून नागपुरी गेट व गाडगेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला असता, घरातील बेडरूममधील आलमाऱ्या उघड्या व साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले. त्यामुळे दरोड्यानंतर विरोध करणाऱ्या ताहेरा बानो यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्यांनी सर्वप्रथम घरात गेलेल्या नुसरत परवीन यांची चौकशी केली तसेच अदील यांच्या अन्य काही नातेवाइकांचे बयाण नोंदविले. पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भरदिवसा दरोडा व हत्या करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भय व्याप्त होते.
दरम्यान, ताहेर बानो यांची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात पुढे आले आहे. रविवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अमित क्षार यांनी ताहेर बानो यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
मोलकरणीचे बयाण नोंदविले
पाहुणचार असल्याने अदील यांच्याकडे घरकाम करणारी नुसरत परवीन हिला लवकर बोलाविले होते. रविवारी दुपारी १.३० वाजता नुसरत पोहोचली. तिला दार उघड दिसले. स्वयंपाकगृहात ताहेरा बानो फरशीवर पालथ्या पडून होत्या. तिने घटनेची माहिती अदील यांना दिली. त्यानंतर ताहेरा यांना तात्काळ डॉ. सोहेब बारी यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना अन्य एका खासगी रुग्णालयात नेऊन घरी परत आणले, असे बयाण नुसरतने पोलिसांना दिला. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.

Web Title: The murder of a crippled old man after theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून