महापालिका शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:51+5:302021-01-08T04:35:51+5:30

अमरावती : शिक्षकांच्या लोणावळा येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात महापालिकेचे आदर्श शिक्षक योगेश चाटे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञाशोध ...

Municipal teachers honored by the Minister of Education | महापालिका शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव

महापालिका शिक्षकांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Next

अमरावती : शिक्षकांच्या लोणावळा येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात महापालिकेचे आदर्श शिक्षक योगेश चाटे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून दिले. शाळेत नवनवीन उपक्रम राबविले तसेच भाजीबाजार येथील महापालिका हिंदी उच्च प्राथमिक शाळा क्र. ११ ही शाळा राज्यस्तरावर आदर्श ठरल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक गोपाल कांबळे व सहायक शिक्षक यांचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राज्यातील नगरपालिका व महापालिका शिक्षक संघातर्फे राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांकरिता ४ जानेवारीला लोणावळा येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हा गौरव प्राप्त झाला. महापालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्र. ११, भाजीबाज़ार या शाळेस आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल कांबळे, शाळेतील शिक्षक एहफाज़ उल्ला खान, सचिन जैसवाल, बी. जे. शेंडे, प्रफुल्ल करमरकर, अजय शर्मा, आदी उपस्थित होते.

Web Title: Municipal teachers honored by the Minister of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.