महापौरांनी सभा केली स्थगित : काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटमधील वाद चव्हाट्यावरअमरावती : १३ व्या वित्त आयोगातून सदस्यांना निधी वाटपाचे अधिकार हे महापौरांना नव्हे तर आयुक्तांना प्रदान करण्यात यावे, निधीचे समसमान वाटप झालेच पाहिजे, ही मागणी आक्रमकपणे रेटून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या सदस्यांनी एकच गोंधळ कोला. त्यामुळे महापौरांना १० मिनिटे सभा स्थगित करण्याचा प्रसंग ओढावला. या घटनेने महापालिकेत सत्तापक्षात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटमध्ये अंतर्गत वाद असल्याचे पुन्हा बुधवारी स्पष्ट झाले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली सर्वसाधारण सभा पार पङली. यावेळी उपमहापौर शेख जफर, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाजात सहभाग घेतला. मागील सभेचे कार्यवृत्तांत मंजूर करताना प्रारंभी १३ व्या वित्त आयोगातून निधी वाटपाचे अधिकार हे महापौरांना प्रदान करण्यात आल्याबाबत राष्ट्रवादी फ्रंटचे सुनील काळे यांनी आक्षेप नोंदविला. निधी वाटपाचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्यात आल्याचे ठरविण्यात आले होते, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली. सुनील काळे यांची मागणी वाजवी असल्याचे गृहित धरुन त्यांच्या मदतीला सहकारी धावून आले.चार सभेनंतर हजर राहिलेत उपमहापौरगोळीबार प्रकरणी पोलिसांनी तडीपार केलेले उपमहापौर शेख जफर शेख जब्बार हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी महापालिकेत सभेला हजर झालेत. तब्बल चार सर्वसाधारण सभेनंतर उपमहापौर हे सभेला हजर असल्याचे बघून अनेकांचा भुवैय्या उंचावल्या. दरम्यान उपमहापौरांना सभेत हजर राहण्याबाबतचे आदेश उच्च न्यायालयानेच दिले आहेत. आरीफ हुसेन नवे स्वीकृत सदस्यअपत्य प्रकरणी गोत्यात आलेल्या राष्ट्रवादी फ्रंटचे स्वीकृत सदस्य आसिफ हुसेन यांच्या जागी त्यांचे धाकटे बंधू आरिफ हुसेन मुनाफ हुसेन यांची सदस्यपदी महापौर चरणजितकौर नंदा यांनी निवड केली. यावेळी बाके वाजवून त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले. महापौर नंदा, उपमहापौर शेख जफर, आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आरीफ हुसेन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
निधी वाटपावरुन महापालिकेत गोंधळ
By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST