शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महापालिकेच्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना आवरा!

By admin | Updated: April 19, 2016 00:03 IST

अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे सौजन्य नसलेल्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी विनंती सहायक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

सहायक आयुक्तांची आयुक्तांकडे धाव : महापौरांच्या दालनाबाहेर वादअमरावती : अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे सौजन्य नसलेल्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी विनंती सहायक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.महापालिकेतील पाचही सहायक आयुक्तांनी सोमवारी दुपारी या प्रकाराबाबत प्रशासनाकडे सांघिक तक्रार केली. त्यामुळे कार्यालयात परतल्यानंतर आयुक्त शिक्षणाधिकाऱ्यांवर कुठली ‘अ‍ॅक्शन’ घेतात, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बुधवार २० एप्रिलला होणाऱ्या आमसभेपूर्वी सोमवारी दुपारी महापौरांच्या कक्षात पूर्व बैठक घेण्यात आली. यात एका गोपनिय पत्राच्या अनुषंगाने मनपाचे शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांनी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांना जाब विचारला. आपण कुठल्या अधिकारान्वये मला पत्र लिहिले? मला कुणीही पत्र लिहू शकत नाही, असा पवित्रा गुल्हाने यांनी घेतला. मात्र त्या पत्रात कुठलेही आदेश नव्हते. ते विनंतीपत्र आहे, असे वानखडे यांच्यासह अन्य सहाय्यक आयुक्तांनी सांगितले. तथापी गुल्हाने ऐकायला तयार नव्हते. गटनेते आणि महापौरांच्या उपस्थितीत गुल्हाने सहायक आयुक्तांवर चिडले. बैठक संपल्यानंतर सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, महेश देशमुख, योगेश पिठे, प्रणाली घोंगे आणि प्रवीण गुल्हाने यांनी विजय गुल्हानेंना जाब विचारला. महापौरांच्या कक्षात गुल्हानेंना कुठलेही प्रत्युत्तर न देता दालनाबाहेर सहायक आयुक्त व विजय गुल्हानेंमध्ये वाकयुद्ध रंगले. गुल्हाने यांनी आपला अपमान केला असून त्यांना समज द्यावी, असे विनंती पत्र या सहायक आयुक्तांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयात दिले. (प्रतिनिधी)उपायुक्तांनाही विचारला उलट प्रश्न१५ दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी गुल्हाने यांनी उपायुक्त चंदन पाटील यांना उलट प्रश्न विचारला होता. १० हजार रुपये अग्रीम कशाला हवाय? प्रश्नपत्रिका पोहोचविण्याचे नियोजन काय? अशी विचारणा पाटील यांनी गुल्हानेंना केली होती. त्यावर पत्र लिहून ‘नियोजन सांगण्याची गरजच आहे का?’ असा प्रश्न गुल्हानेंनी उपस्थित केला होता. अर्थात माहिती देणे आवश्यकच आहे का? असे गुल्हाने यांनी उपायुक्त पाटील यांना विचारले होते. पाचवी ते आठवीच्या प्रश्नपत्रिका भातकुली पंचायत समितीमधून १४ गटसाधन केंद्रावर पोहोचवायच्या होत्या. त्यासाठी गुल्हानेंनी १० हजार अग्रीम मागितले होते. मात्र त्या प्रश्नपत्रिका केव्हा आणि कशाने पोहोचविणार आहात या नियोजनाची माहिती पाटील यांनी गुल्हानेंना मागितली होती. त्यावर नियोजनाची रुपरेखा न देता आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला उलट प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य गुल्हानेंनी केले होते. वादग्रस्त गुल्हाने!कंत्राटी तत्त्वावर महापालिकेत सेवा देणारे गुल्हाने अल्पकाळातच वादग्रस्त बनले आहेत. याआधी त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना पत्र लिहून महापालिकेच्या शाळांत विनापरवानगी कुणीही येऊ नये, मनपा शिक्षण विभागाला पूर्वसूचना देण्यात यावी, असे निर्देशच दिले होते. त्या पत्रावर बराच वाद झाला होता. डायट प्राचार्यांना कंत्राटी शिक्षणाधिकारी पत्र लिहून जाब विचारू शकतो काय, असा प्रश्न त्यावेळी चर्चिला गेला होता. त्यावर महापालिकेच्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना उत्तर न देता डायट प्राचार्यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे मार्गदर्शन मागवले होते. एका गोपनीय पत्रानुसार शिक्षण विभागासह अन्य विभागप्रमुखांना खबरदारी पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात अधिकाराचा गैरवापर कुठे? गुल्हानेंनी मात्र आम्हा सर्वांचा अपमान केला. तशी तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली.- नरेंद्र वानखडे,सहाय्यक आयुक्त, मनपामाझ्या दालनात वाद झाला नाही; तथापि दालनाबाहेर सहाय्यक आयुक्तांनी गुल्हानेंना जाब विचारल्याची माहिती आहे. - चरणजित कौर नंदा, महापौरमहापौरांच्या दालनात काहीही झाले नाही. मला माहीत नाही. मी कुणाला काहीही बोललो नाही.- विजय गुल्हाने,शिक्षणाधिकारी, मनपा