शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ३७८ कोटींचा प्रकल्प राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

(फोटो/लोगो)फोटो कॅप्शन : मौजा म्हसला येथे पूर्णत्वास आलेल्या प्रधानमंत्री घरकुल योजनेतील सदनिका अमरावती : प्रत्येक कुटुंबाजवळ स्वत:चे घर असावे, ...

(फोटो/लोगो)फोटो कॅप्शन : मौजा म्हसला येथे पूर्णत्वास आलेल्या प्रधानमंत्री घरकुल योजनेतील सदनिका

अमरावती : प्रत्येक कुटुंबाजवळ स्वत:चे घर असावे, या संकल्पोतून ‘प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत महापालिकेचा ३७८ कोटींचा सर्वात मोठा प्रकल्प राज्यात अव्वल ठरला आहे. याअंतर्गत घटक ३ मध्ये ८६० सदनिकांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. घटक ४ मध्ये ६,५२४ लाभार्थ्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळालेली आहे व आतापर्यंत १,७५८ घरे पूर्ण झालेली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घटक क्रमांक ३ (खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे) याअंतर्गत ८६० सदनिकांचे बांधकाम तसेच घटक क्रमांक ४ मध्ये (आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील लाभार्थीद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान) याअंर्तगत ६,५२४ लाभार्थ्यांचे घरकुल बांधण्यास राज्य व केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांची किंमत ३७८ कोटीं असून कामे प्रगतीत आहेत.

या दोन्ही घटकांत लाभार्थींना घरकुल बांधण्यास २.५० लाखांचे अनुदान देण्यात येत आहे. यात केंद्र १.५० लाख व राज्य शासनाचा हिस्सा १ लाखांचा आहे. यात बांधकामाचे चटई क्षेत्रफळ ३० चौरसमीटर म्हणजेच किमान ३२३ चौरस फूट आवश्यक आहे. या योजनेकरिता तत्कालीन आयुक्तांसह विद्यमान आयुक्त प्रशांत रोडे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने या योजनेची कामे आता प्रगतीत असल्याचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी सांगितले.

या योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत असल्याने प्रत्येक विभागाने गती वाढविणे महत्त्वाचे आहे. लाभार्थ्यांना वेळीच अनुदान मिळावे, याकरिता लेखापरिक्षक व मुख्य लेखाधिकारी यांनी नस्तीचा निपटारा तातडीने करणे गरजेचे असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.

पाईंटर

आतापर्यंत प्राप्त अर्ज

* घटक १ मध्ये १५,६६९

* घटक २ मध्ये ४,६२६

* घटक ३ मध्ये २०,०५९

* घटक ४ मध्ये २६,५२६

* एकूण प्राप्त अर्ज ६६,८८०

बॉक्स

असे आहेत चार घटक

या योजनेत चार घटक आहेत. यात घटक क्रमांक १ मध्ये जमिनीचा साधनसंपती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्टयांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे, घटक क्रमांक २ मध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, घटक ३ मध्ये खासगी भागीदारीत परवडणाऱ्या घरांची निर्मिती व घटक ४ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान.

बॉक्स

६.५० ते ८.५० लाखांपर्यंत सदनिका

सद्यस्थितीत मौजा म्हसला १५६ सदनिका, बडनेरा १०५, निंबोरा ४४, नवसारी ८६ रहाटागाव ४२ व बेनोडा येथे ६४ अशा एकूण ४९७ सदनिकांचे काम प्रगतीत आहे. ही सदनिका ९ ते ११.५० लाखांपर्यंत अपेक्षित आहे. यात लाभार्थ्यांचा हिस्सा ६.५० ते ८.५० लाखांपर्यंत राहील. म्हसला येथील ६० सदनिकांचे काम पूर्णत्वाला आले असून, पुढील महिन्यात त्यांना ताबा देण्यात येणार आहे.

बॉक्स

घटक ४ मध्ये ६५२४ लाभार्थ्यांना लाभ

आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान या घटकात सन २०१७-१८ मध्ये ३५६१ लाभार्थ्यांना २५.२१ कोटी, सन २०१८-१९ मध्ये १८०८ लाभार्थ्यांना १६.११ कोटींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. सन २०१९-२० मध्ये ११५५ लाभार्थ्यांकरिता ११.३७ कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

कोट

०००००००००००

००००००००००००००

प्रशांत रोडे

आयुक्त, महापालिका