शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला दरवर्षी १० कोटींचे नुकसान ! मोबाइल टॉवर, भूमिगत केबलवर कर का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:30 IST

१ जानेवारी २०२५ पासून नवा दूरसंचार कायदा लागू : अनुदानाच्या स्वरूपात होणार का भरपाई ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या वेगवान प्रसारासाठी खासगी कंपन्यांना भूमिगत केबल आणि मोबाइल टॉवरकरिता युद्धस्तरावर परवानगी मिळणार आहे. मात्र, या केबल व टॉवरकरिता कर आकारता येणार नाही, असे निर्देश नगर विकास विभागाने दिले. त्यामुळे महानगरपालिकेला वर्षाकाठी कररूपाने येऊ शकणाऱ्या १० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.

नगर विकास विभागाच्या आदेशानुसार राज्यात १ जानेवारीपासून शहरी नागरी स्वराज्य संस्थांमध्ये नवा कायदा लागू झाला. आता या कायद्याची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी अनिवार्य आहे. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने अंमलबजावणीस प्रारंभ केला आहे. हा नवा कायदा खासगी मोबाइल कंपन्यांसाठी लाभदायक ठरणारा आहे. 

आर्थिक डबघाईस आलेल्या महानगरपालिकेला मोबाइल टॉवर आणि भूमिगत केबलवर टॅक्स आकारणीतून दरवर्षी मिळणाऱ्या १० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.

अर्ज करताच वेळेत मिळेल परवानगीखासगी मोबाइल कंपन्यांना टॉवर उभारणी आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या नावे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. हा ऑनलाइन अर्ज मंजूर करताना आयुक्तांना नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. त्याकरिता राज्य शासनाने शुल्क ठरवून दिले आहे. आता महानगरपालिकेला अंमलबजावणी करताना खासगी मोबाइल कंपन्यांची अडवणूक करता येणार नाही, असे नवे धोरण आहे.

अनुदान मिळणार का?नव्या दूरसंचार कायद्यामुळे होणारे आर्थिक नुकसान नगर विकास विभाग महापालिकेला अनुदान रूपात परत देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अमरावती महानगरपालिकेत २१७ अवैध मोबाइल टॉवर उभारण्यात आल्याच्या नोंदी आहेत.

कर आकारणी गुलदस्त्यात?शहरी नागरी स्वराज्य संस्थांच्या प्रमुख उत्पन्नाचे स्रोत हे कर आकारणी आहे. मात्र, राज्य शासनाने नवा दूरसंचार कायदा लागू करताना खासगी मोबाइल टॉवर कंपन्यांना कनेक्टिव्हिटीच्या नावे मोठी सूट दिली आहे. केवळ भूमिगत केबल टाकणे व टॉवर उभारणी यावरच शुल्क आकारता येणार आहे. केबल, टॉवरला कर आकारणीचा आदेशात उल्लेख नाही. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी ऑनलाइन अर्ज केला की परवानगी मिळेल, असे शासनाचे निर्देश आहेत.

"शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल. खासगी मोबाइल कंपन्यांनी टॉवर उभारणी आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नियमानुसार परवानगी दिली जाईल."- महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, मनपा

टॅग्स :AmravatiअमरावतीTaxकर