शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
4
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
5
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
6
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
7
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
8
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
9
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
10
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
11
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
12
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
13
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
14
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
15
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
16
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
17
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
18
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
19
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
20
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज

महापालिका : ५४

By admin | Updated: February 22, 2017 00:04 IST

महापालिकेच्या ८६, जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले.

विलासनगर-मोरबाग सर्वाधिक ६२.०३ : साईनगर निचांकी ४७.६७अमरावती : महापालिकेच्या ८६, जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. महापालिका क्षेत्रात केवळ ५४.३० टक्के मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. मंगळवारच्या मतदानानंतर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ६२७ तर जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ९५० उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. जिल्हा परिषद व महापालिकेची मतमोजणी गुरुवार २३ फेब्रुवारीला होईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी तहसीलस्तरावर तर महापालिका निवडणुकीची मतमोजणी विभागीय क्रीडा संकुलात होईल. अमरावती : महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेतील ८६ जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. बहुतांश मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदारांनी शिस्तीत रांगा लावून मतदान केले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदानकेंद्रांवर दुपारी ३ नंतर मतदानाचा टक्का वाढला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदारांनी मतदान केले.मतपत्रिकेचा क्रम चुकल्याने गोंधळअमरावती : सन २०१२ ला सुद्धा सरासरी ५४ टक्के मतदार झाले होते. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानानंतर ६२७ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले. गुरूवार २३ फेब्रुवारीला येथिल विभागीय क्र ीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक ठिकाणी मतदारांच्या उत्साहावर विरजण पडले. मतदार यादीतील घोळामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी मतदान केंद्रात बसून मतदारांना धमकावण्याचा प्रकार उघड झाला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी युवा स्वाभिमान कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने मतदारांना एकाच वेळी चार जणांना मतदान करावे लागले. अ,ब,क,ड हा क्रम चुकल्याने काही मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने मंगळवारी २२ प्रभागातील ८६ जागांसाठी सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली. (प्रतिनिधी)मोरय्यांना बाहेर काढलेराजापेठ प्रभागातील युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवार जयश्री मोरय्या या मतदानकें द्राच्या आवारात बसून मतदारांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यात आले. अंबिकानगरस्थित महापालिकेच्या हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदारयादीत नाव सापडेना यंदाची सार्वत्रिक निवडणूक चारसद्स्यीय प्रभागपद्धतीने होत असल्याने प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. सन २०१२ ची निवडणूक ४३ प्रभागात घेण्यात आली. या ४३ प्रभागांचे यंदा २२ प्रभागात विलिनीकरण करण्यात आल्याने प्रभागाच्या लोकसंख्येसोबतच मतदारांची संख्या वाढली. प्रभागाची व्याप्ती वाढल्याने मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली. अनेकांना त्यांची नावे मतदारयादीत सापडू शकली नाहीत. तर अनेकांची नावे लगतच्या प्रभागामध्ये दिसून आल्याने मतदारांची वेळेवर धावाधाव झाली.