लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुरुवारी ८ जून रोजी ते एक दिवसाच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ना. मुनगंटीवार हे नागपूर येथून वाहनाद्वारे दुपारी १.३० वाजता मोझरी येथील श्री. गुरुकुंज सेवा समितीच्या आश्रमास भेट देतील. मोझरीहून अमरावतीकडे दुपारी २.१५ वाजता प्रयाण करतील. त्यानंतर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान आयोजित वृक्ष लागवडीसंदर्भात आढावा बैठक घेतील. सायंकाळी ६ वाजता ‘लोकमत’द्वारे आयोजित ‘आॅयकॉन आॅफ अमरावती’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर ते रात्री ८ वाजता अमरावतीहून यवतमाळ मार्गे चंद्रपूरकडे वाहनाद्वारे रवाना होतील.
मुनगंटीवार आज अमरावतीत
By admin | Updated: June 8, 2017 00:11 IST