शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

क्रिप्टो करन्सी ऑनलाइन फ्रॉडच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दर्यापुरातून १३ युवकांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:48 IST

एका घरात राहत होते भाड्याने : क्रिप्टो करन्सी ऑनलाइन फ्रॉडचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर (अमरावती) : स्थानिक वसंतनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत एका घरात अनेक दिवसांपासून भाड्याने राहत असलेल्या १३ युवकांना मुंबई पोलिसांनी बुधवारी दुपारी १ वाजता अचानक धाड टाकून ताब्यात घेतले. या आकस्मिक कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

पोलिसांची दोन वाहने अचानक दाखल झाल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळेस पोलिसांनी युवक राहत असलेल्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन, अनेक मोबाइल, लॅपटॉप, इतर साहित्य सुद्धा जप्त केले. नेमके प्रकरण काय, याची मुंबई पोलिसांना विचारपूस केली असता, त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. परंतु, हे प्रकरण क्रिप्टो करन्सी ऑनलाइन फ्रॉडचे असल्याचे दर्यापूर पोलिसांकडून सांगण्यात आले.

परिसरातील नागरिकही अनभिज्ञ वरळी (मुंबई) च्या ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणावरून मुंबई येथील तपास पथक दर्यापुरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने युवकांचे मोबाइल लोकेशन शोधून त्यांनी वृंदावन कॉलनीतील बंडू पवार यांचे घर गाठले. त्यांच्या घरी सात ते आठ तरुण मुले भाड्याने राहत असल्याची माहिती नागरिकांना होती. तथापि, येथे वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये १८ ते २२ वर्षे वयोगटातील एकूण १३ युवक आढळून आले. 

४२ मोबाइल जप्त युवकांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ एकूण ४२ मोबाइल, एक कार व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मुख्य आरोपी पुण्याचा ताब्यात घेतलेल्या युवकांना वर्क फ्रॉम होमचे आमिष देण्यात आले होते. तुम्हाला क्रिप्टो करन्सीवर लक्ष ठेवून ओटीपी जनरेट करून मिळाल्यावर ती शेअर करायची आहे, असे मुख्य आरोपीने सांगितले होते. तो पुण्याचा असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Daryapurदर्यापूरCryptocurrencyक्रिप्टोकरन्सीfraudधोकेबाजीAmravatiअमरावती