शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुलूप तोडून घेतला खासदारांनी कार्यालयाचा ताबा; चंद्रकांत पाटलांना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:27 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत जिल्ह्याच्या खासदारांसाठी एक कार्यालय तयार करण्यात आलेले आहे.

अमरावती : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कुलूपबंद कार्यालयाचा ताबा मिळावा, यासाठी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतू १७ व्या दिवसांनतरही प्रशासनाद्वारे चावी देण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले व लगेच कुलूप फोडून कार्यालयाचा ताबा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत जिल्ह्याच्या खासदारांसाठी एक कार्यालय तयार करण्यात आलेले आहे. आचारसंहितेच्या काळात जिल्हा प्रशासनाने हे कार्यालय नवनीत राणा यांच्याकडून ताब्यात घेऊन त्याला कुलूप लावले होते. दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रक्रिया आटोपली व महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे विजयी झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी या कार्यालयाची मागणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे केली.  त्यानंतर  वानखडे यांच्याद्वारे सातत्याने जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असतांना नियोजन विभागाने या कार्यालयाची चावी वानखडे यांना दिली नाही. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले. त्याचे एक दिवसपूर्व देखील चावी मागितली. मात्र प्रशासनाने दिली नसल्याने वानखडे व यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. त्यांनी पालकमंत्री यांना झालेला घटनाक्रम सांगितला. यावेळी आ. प्रवीण पोटे पाटील यांनी देखील मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, उपस्थित जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी चावी विषयी चकार शब्द न काढल्याने  ठाकूर यांचा पारा चढला व आंदोलन करुन कुलूप फोडणार व काय गुन्हे दाखल करायचे ते करा, अशी तंबी प्रशासनाला दिली व शासन, प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करुन कार्यालयाचे कुलूप फोडले व कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी शहराध्यक्ष बबलू शेखावर, माजी, महापौर, विलास इंगोले, बाजार समितीचे  सभापती हरीष मोरे, प्रवीण मनोहर, वैभव वानखडे, योगेश देशमुख यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीYashomati Thakurयशोमती ठाकूरchandrakant patilचंद्रकांत पाटील