शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात मामूविरूध्द एमपीडीए; वर्षभरासाठी सेंट्रल जेलचा पाहुणा! या वर्षातील सातवा एमपीडीए 

By प्रदीप भाकरे | Updated: September 15, 2024 14:54 IST

अभिषेक उर्फ मामु हा सन २०१९ पासून गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचेविरूध्द राजापेठ, फ्रेजरपुरा ठाण्यात खून, जबरी चोरी, दरोडा, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवून दंगा करणे, अग्निशस्त्र बाळगणे, अधिसुचनांचे उलघंन करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहे.

अमरावती: खून, दरोड्यासह सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार अभिषेक उर्फ मामु रमेश डिक्याव (२३, रा. मेहरबाबा कॉलनी, जेवड नगर, अमरावती) याच्याविरूध्द एमपीडीएअन्वये कारवाई करण्यात आली. त्यानुसार त्याला १४ सप्टेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबध्द करण्यात आले.अभिषेक उर्फ मामु हा सन २०१९ पासून गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचेविरूध्द राजापेठ, फ्रेजरपुरा ठाण्यात खून, जबरी चोरी, दरोडा, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवून दंगा करणे, अग्निशस्त्र बाळगणे, अधिसुचनांचे उलघंन करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते. तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याच्याविरूध्द एमपीडीए करण्याबाबतचा प्रस्ताव राजापेठ पोलिसांनी पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाची गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक सिमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील एमपीडीए सेलमधील सहायक पोलीस निरिक्षकइम्रान नायकवडे, पोलीस अंमलदार विनय गुप्ता, अजय मिश्रा, चेतन कराडे यांनी पुर्तता केली. त्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी १४ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले. राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांनी तो आदेश तामिल करून त्यास स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.रेड्डींच्या कार्यकाळातील १६ वा एमपीडीए -नवीनचंद्र रेड्डी यांनी डिसेंबर २०२२ मध्ये अमरावती शहर पोलीस आयु्क्तपदाचा कार्यभार स्विकारला होता. गुन्हेगारीला प्रतिबंध व गुन्हयांना अटकाव घालण्यासाठी रेड्डी यांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या आयुधांचा प्रभावी वापर केला. मामूविरूध्द केलेला एमपीडीए यंदाच्या वर्षातील सातवा ठरला आहे. तर रेड्डी यांच्या कार्यकाळात आतापर्यंत १६ कुख्यातांविरूद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिसjailतुरुंग