शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 18:33 IST

कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही येणाऱ्या भविष्यात महाराजांचा पुतळा बसणार हे लक्षात ठेवा, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी यावेळी दिला. 

ठळक मुद्देशिवछत्रपतींचा पुतळा तेथेच; मात्र सनदशीर मार्गाने!पोलीस, महापालिकेला सहकार्य मात्र, हक्कभंगही दाखल करणार

अमरावती : शिवछत्रपतींचा पुतळा तेथेच बसवू, मात्र सनदशीर मार्गाने, परवानगी घेऊनच. महापालिका निवडणुकीनंतर सत्ता आल्यास पहिला ठराव तोच असेल, असा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला. १९ फेब्रुवारी रोजी युवा स्वाभिमान पक्ष कार्यकर्ते, मावळे, शिवप्रेमींनी शांततेच्या मार्गाने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधून मुख्यमंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर शरसंधान केले. जनप्रतिनिधी म्हणून महापालिका आयुक्तांनी आपल्याला भेट नाकारली. तर पोलीस आयुक्तांनी राजकीय दबावात येऊन खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. दोघांविरूद्धही हक्कभंग दाखल करून आपण त्यांना लोकसभा, मानवाधिकार आयोग, मागासवर्गीय आयोग व दक्षता समितीसमोर उभे करू, असा दावा देखील त्यांनी केला. 

प्रत्येकाची वेळ येत असते. कुणीही अमृत पिऊन आलेले नाही. तिकडे मुख्यमंत्री मातोश्रीत बसून आम्हा दाम्पत्याला जेलमध्ये कसे टाकता येईल, याबाबत राजकारण करतात, तर इकडे महिला पालकमंत्री देखील षड्यंत्र करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

शाईफेक प्रकरणी झालेले दबावाचे राजकारण कुणाच्याही पचनी पडलेले नाही. प्रशासनातील वरिष्ट अधिकाऱ्यांनी देखील ३०७ चा गुन्हयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. मात्र आम्ही दबावतंत्राला बळी न पडता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊ, राजापेठ उड्डाणपुलासोबतच छत्री तलाव परिसरात देखील शिवछत्रपतींचा पुतळा उभारू, अशी माहिती देखील त्यांनी दिली. गुन्हा दाखल असलेल्या आमदार रवी राणा यांच्यासह अटक करण्यात आलेल्या कुणाचाही त्या शाईफेक प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे आमदार राणा हे फरार नाहीत, अटक करण्याचे काम पोलिसांचे आहे, अशी मल्लीनाथी देखील त्यांनी केली.

राऊतांची पत्रकार परिषद फक्त फुसका बारच

 शिवसेना खासदार संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतात व त्यात ते पोपटासारखे बोलतात. काल जी पत्रकार परिषद झाली, त्यात फक्त फुसका बारच होता. महिला व बालकल्याण विभागात जे घोटाळे झाले याची चौकशी ईडी मार्फत केली जाईल, अशा शब्दांत राणा यांनी राऊतांवर टीका केली.

दरम्यान, राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी विनापरवानगी पुतळा बसविला होता. हा पुतळा अनाधिकृत असल्याचं सांगत महापालिकेच्या वतीने तो पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला होता. यावरून शहरातील वातावरण चांगलच तापलं होतं. पोलिसांनी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना नजरकैदेत ठेवलं होतं. तर, आक्रमक झालेल्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर जमा होत आंदोलन केले होते.

त्या प्रकरणानंतर नुकतच महापालिका आयुक्तांवर शाई फेकण्यात आली होती. याप्रकरणी आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. खा. नवनीत राणा या आयुक्तांना भेटायला गेल्या होत्या. मात्र, आयुक्तांनी प्रकृतीचं कारण देत भेट नाकारली, यानंतर संतप्त नवनीत राणा यांनी आयुक्तांवर आरोपही केले होते. तर, आता पोलीस दबावाखाली काम करत आहेत. मुख्यमंत्री व पालकमंत्री हे वाईट राजकारण करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही खा. नवनीत राणा यांनी केला आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAmravatiअमरावती