शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा मैदानात; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 15:27 IST

बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना धोका असून, त्यांना सुरक्षा प्रदान करा, तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबत खासदार राणा यांनी शनिवारी एक व्हिडीओ जारी केला आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदारांना सुरक्षा आहे त्यांच्या कुटुंबीयांना नाही, असे व्यक्तव्य केले आहे. या व्यक्तव्याचा खासदार राणा यांनी खरपूस समाचार घेतला. संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचे आहे? तुम्ही बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना मारणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे बंडखोर आमदार आहेत, ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते पाईक आहेत. बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परंतु आजमितीला शिवसैनिक गुंडगर्दी करीत असून, आमदार, खासदारांच्या कार्यालयाची तोडफोड करीत आहेत. महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची राजवट संपुष्टात आणण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली. एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारुन शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार फोडले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना की शिंदेसेना? असा नवा वाद सुरू झाला आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक असल्याची पावती खासदार नवनीत राणा यांनी  दिली. बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ