शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत राणा दाम्पत्य नजरकैदेत! मध्यरात्री कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 09:19 IST

शिवछत्रपतींचा अनधिकृत पुतळा हटविला

अमरावती : येथील राजापेठ उड्डाणपुलावर मां जिजाऊंच्या जयंतीदिनी, १२ जानेवारी रोजी शिवप्रेमींनी बसविलेला सहा फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री प्रचंड बंदोबस्तात हटविला. तब्बल चार दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विनापरवानगी बसविलेला पुतळा हटविण्याची कारवाई केली.आमदार रवि राणांनी दोन दिवसांपूर्वी पुतळा परवानगीसंदर्भात महापालिकेत बैठक घेतली. त्याचवेळी त्यांनी परवानगी देता येणार नाही, असे कारण समोर करून पुतळा हटविल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला होता. यावर महापालिका प्रशासनाने आपली भूमिका मात्र स्पष्ट केली नव्हती. दरम्यान रविवारी मध्यरात्रीनंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने उड्डाणपुलावरील पुतळा हटविला. यामुळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते प्रचंड संतापले.पुतळा हटविल्याची कारवाई झाल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्रीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले. राणा यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त असून राज्य राखीव दल, दामिनी पथक, राजापेठ पोलीस विशेष शाखा बारकाईने नजर ठेवून होते. वज्रसह दंगल विरोधी पथकदेखील तैनात आहेत. सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांनी १९७३ च्या प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (३) द्वारे प्रदान अधिकाराचा वापर करून आ. रवि राणा यांना १६ जानेवारी रोजी निवासस्थानाबाहेर पडू नये, असा मनाई आदेश जारी केला आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा