लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपली आईच आपल्याला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करत असल्याची धक्कादायक उकल एका १५ वर्षीय मुलीने केली आहे. तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी तिच्या आईविरुद्ध २९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.
दहावीची विद्यार्थिनी असलेली रिया (नाव बदललेले) ही आईसह नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या वडिलांचा सन २०१६ मध्ये मृत्यू झाला. तिच्या आईने गतवर्षी रायपूर येथील एकाशी लग्न केले. दोघी मायलेकी येथेच राहतात. २० जानेवारी रोजी ती प्रात्यक्षिकासाठी शाळेत गेली. घरी येण्यास वेळ झाल्याने ती कुण्या मुलासोबत आहे, असे तिच्या आईला वाटल्याने तिचा संताप झाला.
२० रोजी जानेवारी रोजी सायंकाळी रियाला तिच्या आईने घराच्या गॅलरीत थंडीत कोंडले. तुझा जीव घेणार म्हणत तिने तिला गॅसच्या पाईपने मानेवर मारहाण केली. हाताला चावा घेतला.
गॅलरीतून उडी मारून तिने गाठले आप्तांचे घर२१ जानेवारी रोजी महिला बाहेर गेली असता, रियाने गॅलरीमधील मॅट कापली व उडी घेऊन ती खाली उतरली. तिने मोठ्या आईचे घर गाठले. रात्रभर ती तेथेच होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तिला तेथून ताब्यात घेतले.
कोंडून ठेवले, मारहाण केली, ती नेहमीच त्रास देते
- आईने आपल्याला कोंडून ठेवले. मारहाणदेखील केली. ती नेहमीच त्रास देते, शिवीगाळ करते तसेच वेश्या व्यवसायास प्रवृत करते, जिवे मारण्याची धमकी देते, असे रियाने पोलिसांसह बालकल्याण समितीला सांगितले.
- २ त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला सीडब्ल्यूसीच्या आदेशाने मुर्लीच्या निरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे. मात्र, तिची परीक्षा व पुढील शिक्षण पाहता, तिला आपल्याकडे देण्यात यावे, अशी विनंती आरोपी महिलेने केल्याचे गुरूवारी समोर आले.
- बाल कल्याण समितीने पीडिताचे 3 म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांना तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
"बालकल्याण समितीसमोर त्या अल्पवयीन पिडिताने कैफियत मांडली. तिचे ऐकल्यानंतर तिच्या आईला नोटीस देण्यात आली. मुलीला बालगृहात पाठविले. तथा पोलिसांना एफआयआरचे निर्देश दिलेत."- अॅड. सीमा भाकरे, विधी अधिकारी