शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आई म्हणाली, तासनतास मोबाईलवर बोलत राहते, मुलगी परांगदा!

By प्रदीप भाकरे | Updated: July 11, 2023 13:04 IST

मोबाईलसाठी हटकले : तीन दिवसांपासून निव्वळ शोध

अमरावती : अलिकडे टिनएजर मुलामुलींचा स्क्रिनटाईम भलतच वाढला आहे. अन्य सोशल मिडियाच्या तुलनेत इन्स्टावर तासनतास घालवले जातात. पालक बोलले की त्या पाल्यांचे गाल फुगतात. मोाबईलसाठी हटकल्याने घर सोडून जाणारेही कमी नाहीत. टिनएजर मुलेमुली घरातून पळून जातात, त्यामागे मोबाईल व त्यावरील सोशल मिडियाचा अतिरेक सर्वाधिक कारणीभूत ठरला आहे. अशी एक घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. मोबाईलवरून आई बोलल्याने एका अल्पवयीन मुलीने घर सोडले.

त्याचे झाले असे की, मोबाईलवर बोलत असल्याने तिच्या आईने तिला रागावले. परिणामी ती मुलगी रागात घर सोडून गेली. बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलै रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी ९ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार ती मुलगी तिच्या आईला ७ जुलै रोजी सायंकाळी एका मुलासोबत फिरताना दिसली. त्यामुळे तिच्यावर तिची आई रागावली. त्यानंतर ८ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ती फोनवर बोलत असल्याने तिची आई पुन्हा रागावली. एवढ्या रात्रीपर्यंत फोनवर राहते, सकाळी उठत नाही. अशा शब्दात तिची खरडपट्टी काढली. त्यामुळे एका तासाने सकाळी ६.३० च्या सुमारास ती रागारागाने घराबाहेर निघून गेली. तिची शोध घेण्यात आला. मात्र ती आढळून न आल्याने बडनेरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिचा शोध चालविला आहे. पालकांकडूनही शोधाशोध सुरू आहे.

मुले मुली पळून जाण्याची कारणे

मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. वडील पैसा कमविण्यात; तर आई घरकामात वा नोकरीत गुंतलेली असते. वयात येत असताना मुलांच्या हाती स्मार्टफोन देण्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर पडतो. मैत्रिणींना असलेला बॉयफ्रेंड आपल्यालाही असावा, असे विचार मनात येणे स्वाभाविक आहे. घरात कुणी वेळ देत नाही; म्हणून ती बाहेर कोणी वेळ देणारा शोधत असते. त्यातून मुली नको त्या वयात प्रेम नावाच्या जाळ्यात अडकतात. सोशल मीडियाचा अतिवापर मुले पळून जाण्यास कारणीभूत ठरत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती