शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत! सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 11:53 IST

२०२२ चा आदेश बेदखल : नव्याने अंमलबजावणीचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य महाविद्यालयांत सीसीटीव्ही आहेत, मात्र काही अपवाद वगळता अनेक शासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत असे कॅमेरे नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत, तिथे केवळ शोबाजी न करता त्याची सातत्याने तपासणी होणे गरजेचे आहे. एखादी घटना घडण्यापूर्वी यंत्रणेने सुधारणा करण्याची गरज आहे. जिल्ह्यातही काही वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालयांत काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. शाळेच्या आवारात, वर्गात चोरीच्या घटनाही घडत आहेत. मुलींना छेडण्याचे आणि धमकाविण्याचे प्रकारही घडतात. मात्र, अनेकवेळा त्याची नोंदही होत नाही. त्यामुळे प्रकाराला आळा घालण्यासह शाळाच्या कॅम्पसमध्ये सुरक्षा मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही गरजेचे आहेत. 

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५८३ हून अधिक प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत. या शाळांपैकी बहूतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह आहे. वास्तविक, खासगी असो अथवा शासकीय प्रत्येक शाळेत कॅमेरे बसविण्याची अनिवार्य आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स् आणि अभियांत्रिकी अशा विविध महाविद्यालयासह कॉन्व्हेंटची संख्या मोठी आहेत. यातील बहुसंख्य महाविद्यालयांत सीसीटीव्ही आहेत. मात्र, यामध्ये शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराचा अभाव आजही आहे. शाळा परिसर व विद्यार्थ्याच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे आवश्यक झाले आहेत. विशेष म्हणजे राज्य शासनाने दोन दिवसापूर्वी जारी केलेल्या आदेशापूर्वी १० मार्च २०२२ रोजी याबाबात आदेश काढले होते. त्यांची प्रभावी अंमबजावणी झाली नसल्याचे चित्र दिसून आले.

शिक्षण विभागाकडे नाही माहिती जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या सुराक्षततेसाठी सीसीटीव्ही कमर असणे आवश्यक आहेत. तसे आदेशही यापूर्वी राज्य शासनाने दिलेले आहेत. विशेष म्हणजे १० मार्च २०२२ रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने आदेश काढले होते. मात्र त्याची अंमलबजावणी कामदोपत्रीच राहिली. 

 

टॅग्स :Amravatiअमरावती