संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत ग्रामीण भागात एकूण ३२ पोलीस ठाणे येतात. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणारे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख जिल्हा व राज्य मार्गावर वर्षभरात सर्वाधिक ३१७ अपघात घडले. यामध्ये १३५ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली. यात ९० पुरुष व सहा महिला अशा ९६ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता दरवर्षी शासनाच्या आरटीओ, पोलीस प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकामसह इतर विभागांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते; पण अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहेत.आणखी १९ ब्लॅक स्पॉट वाढलेजिल्ह्यात आणखी १९ अपघातप्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट) वाढल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. शहर वाहतूक पोलीस व जिल्हा ग्रामीण वाहतूक पोलिसांची ‘ब्लॅक स्पॉट’ची आकडेवारी यात कुठेही तारतम्य नाही. त्यांची आकडेवारी आरटीओच्या आकडेवारीशी जुळेनाशी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात एकूण २९ ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याची माहिती दिली. परंतु, दीड वर्षांपूर्वी ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आले होते. २५ नोव्हेंबर २०१९ ला रस्ता सुरक्षा संसदीय क्षेत्र समितीच्या बैठकीत १९ ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये वाढ करून ४८ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली. त्या ब्लॅक स्पॉटची सुधारणा किंवा उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ती यादी पाठविण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेमके ‘ब्लॅक स्पॉट’ किती, याची तपासणी करून किती ठिकाणचे ‘ब्लॅक स्पॉट’ची सुधारणा केली आहे, याची वरिष्ठ अधिकाºयांंद्वारे तपासणी होणे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST
ग्रामीण हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ३६ अपघातांची नोंद झाली. यामध्ये १२ जणांचे प्राण गेले. यामध्ये १० पुरुष व दोन महिला आहेत. ४६ जण जखमी झाले. राज्य मार्गांवर एकूण २८१ अपघात झाले. यामध्ये १२३ जणांचे बळी गेले. यात १०९ पुरुष व १४ महिला आहेत. ग्रामीण हद्दीत इतर २४२ अपघातांची नोंद झाली.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात
ठळक मुद्दे३१७ अपघातांमध्ये १३५ जणांचा मृत्यू : ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आकडेवारी