शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

मोर्शीतील राज्यमहामार्ग प्रकाशमय

By admin | Updated: February 18, 2015 00:10 IST

शहरातील महाराष्ट्र कॉलनी ते नळा नदी पर्यंतचा मुख्य राज्यमहामार्ग पथदिव्यांमुळे प्रकाशमान झाला असल्याने मोर्शीकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोर्शी : शहरातील महाराष्ट्र कॉलनी ते नळा नदी पर्यंतचा मुख्य राज्यमहामार्ग पथदिव्यांमुळे प्रकाशमान झाला असल्याने मोर्शीकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.शहरातील मुख्य राज्य महामार्गावर रस्ता दुभाजक आणि पथ दिव्यांची मागणी नागरिकांव्दारे सातत्याने केल्या जात होती. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अनुदानातून यापूर्वी शासकीय रुग्णालय परिसर ते पोलिस ठाणे परिसरापर्यंत पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तथापि निधी अभावी पुढील पथदिव्यांची कामे होवू शकली नव्हती.नगर परिषदेची आर्थिक स्थिती पाहता पुढील मार्गावरील पथदिव्यांची निर्मिती करणे शक्य नव्हते. दरम्यान मागील वर्षी तत्कालिन नगराध्यक्षा रेश्मा नितीन उमाळे यांनी सागर मेघे यांच्या मोर्शी नप भेटीप्रसंगी पथदिव्यांचा प्रश्न रेटला होता. शासनाच्या वैशिष्टयपूर्ण कार्य योजनेतून पथदिव्यांची निर्मीती करता येत असल्याचे पाहून तत्कालिन वित्त मंत्री राजेंद्र मूळक यांच्या आणि तत्कालिन खासदार दत्ता मेघे सहकार्याने ही योजना मान्य करण्यात आली आणि अनुदान प्राप्त झाले होते. या योजनेतून मुख्य राज्य महामार्गावरील महाराष्ट् कॉलनी ते नळा नदीपरीसर पर्यंत पथदिव्यां करीता ५० खांब आणि प्रत्येक खांबावर दोन मिळून एकूण १०० दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. या अतिरिक्त प्रकाश व्यवस्थे करीता विजेच्या दोन डीबी ची आवश्यकता होती, मुख्य राज्य महामार्ग खोदून जमीनीखालून केबल टाकण्या करीता सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची नूकसान भरपाई नप ला करावयाची होती. या दोन बाबी करीता लक्षावधी रुपयाचा खर्च नगर परिषदेचा होणार होता. याच कारणामुळे जवळपास ८ महिणे पर्यंत प्रत्यक्षात पथदिवे सुरु होवू शकले नव्हते. नागरीकांच्या सततच्या रेटयामुळे नप प्रशासनाने साबा विभागाकडे ३ लक्ष ७१ हजार रुपयाचा भरणा केला. तर दूसरीकडे राज्य विज वितरण कंपनीने जनहिताचा विचार काता विजेच्या विद्यमान भार क्षमतेला विभागून तात्पूरत्या स्वरुपात विज जोडणी करुन दिली. त्यामुळे संपूर्ण मार्ग सध्या प्रकाशमान झाला आहे.