शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये मान्सून खोळंबणार, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:27 IST

Amravati : मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागरावरून ६ जून रोजी विदर्भात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : नैऋत्य मान्सून सध्या मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. तो मुंबई, कर्नाटकसह महाराष्ट्राच्या काही भागात, बंगळुरूसह तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग इथपर्यंत पोहोचला आहे. परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळ परिवलन मध्य ट्रोपोस्फेरिक पातळीपर्यंत विस्तारित आहे. २७ मे रोजी पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरातर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 

मोसमी वाऱ्यांना ब्रेक कशामुळे?कोरडी हवा मान्सूनसाठी घातक ठरते. कारण ती मान्सूनच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणास बाधा पोहोचवते. मान्सून म्हणजे ऊबदार, आर्द्र हवासमूहांमुळे होणारा पाऊस. जर हवा कोरडी असेल, तर ती बाष्पीभवन कमी करते, ज्यामुळे ढग तयार होण्यास मदत होत नाही. कोरड्या हवेचे मान्सूनवर परिणाम होतात.

आर्द्रता कमी होणेकोरड्या हवेमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते. ही आर्द्रता ढगांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. आर्द्रता कमी झाल्यास ढग तयार होत नाहीत आणि पाऊस पडत नाही.

पेरणीलायक पाऊस कधी?मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस विश्रांती घेणार, शेतीची कामे उरकवा : २७ मे ते १ जूनदरम्यान संपूर्ण राज्यात चारही विभागात पावसाची शक्यता ही विखुरलेल्या आणि गडगडाटी स्वरूपात राहील. पावसाचे प्रमाण हे मुंबई, कोकण, नगर, पुणे आणि नाशिक या भागात जास्त राहील. कमी वेळेतच जास्त पाऊस अनुभवायला येईल. बाकी विभागात १ ते ६ जूनपर्यंत सूर्यदर्शन राहील. यावेळी शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणीची कामे उरकून घ्यावीत आणि पुढे जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

"साधारण पेरणीलायक पाऊस हा विदर्भात १३ जून, मराठवाडा २१ जून आणि उत्तर महाराष्ट्रात १७जूनपासून अपेक्षित आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, त्यांनी आताच्या मान्सूनपूर्व ओलीवर पेरणी केली तरी चालेल."- अभिषेक खेरडे, हवामान अभ्यासक

टॅग्स :Amravatiअमरावतीfarmingशेती