शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

निजामपुरात माकडांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

औषधी पालकांना अमरावतीहून आणावी लागली. घटनेची माहिती पालकांनी व गावकऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या महितीवरून वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. पण, या पथकालाही हुलकावणी देण्यात ते माकड यशस्वी ठरले आहे. दुसऱ्या गावातून हे एकच लालतोंडे माकड सहा महिन्यांपूर्वी निजामपूरात दाखल झाले. आधी या माकडाने प्राण्यांना, लहान बकऱ्या व कुत्र्याच्या पिलांना त्रास द्यायला सुरुवात केली.

ठळक मुद्देदोन महिन्याच्या बाळाला जखमी करून पाळण्याबाहेर ओढले : गावकऱ्यांसह जनावरेही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील निजामपूर गाव सहा महिन्यांपासून लालतोंड्या माकडामुळे दहशतीखाली आहे. घरापुढे खेळणाऱ्या  मुला-मुलींसह ११ महिलांना त्याने आतापर्यंत जखमी केले. ओरबडून त्यांना चावा घेतला आहे. यादरम्यान १ ऑगस्टला त्या माकडाने घरात घुसून पाळण्यात झोपलेल्या सान्वी ढाकूलकर नामक अवघ्या दोन महिन्याच्या बाळाला नाकावर, गालावर ओरबडले. तिला गंभीर जखमी करून त्या पाळण्यातून कापडासह घराबाहेर ओढत नेण्याचा प्रयत्नही त्या माकडाने केला. बाजूलाच असलेल्या आईने आरडाओरड केल्यामुळे त्या बाळाला दारात टाकून माकड पळून गेले.गंभीर जखमी झालेल्या या दोन महिन्याच्या बाळावर परतवाडा येथील खासगी दवाखान्यात औषधोपचार करण्यात आले. काही औषधी पालकांना अमरावतीहून आणावी लागली. घटनेची माहिती पालकांनी व गावकऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या महितीवरून वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. पण, या पथकालाही हुलकावणी देण्यात ते माकड यशस्वी ठरले आहे. दुसऱ्या गावातून हे एकच लालतोंडे माकड सहा महिन्यांपूर्वी निजामपूरात दाखल झाले. आधी या माकडाने प्राण्यांना, लहान बकऱ्या व कुत्र्याच्या पिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. अचानक ते माकड मागून यायचे आणि पाळीव प्राण्यांच्या, बकऱ्यांच्या अंगावरील केस उपटायचे. ओरबाडलेदेखील.अखेर माकडापायी त्रस्त होऊन श्रीकृष्ण नागापुरे व सुनंदा उमाळे यांनी आपल्याजवळील बकºया विकल्या. या प्राण्यांना त्रास दिल्यानंतर त्याने आपला मोर्चा सकाळी अंगणात सडासंमार्जन करणाऱ्या करणाऱ्या महिलांकडे वळविला. रविवारी निजामपूर येथील रंगुबाई राहाटे या ७५ वर्षीय वृद्धेच्या हातास त्या माकडाने चावा घेतला.माकडाला पकडागावकऱ्यांसह ग्रामपंचायतने ठराव घेऊन त्या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागासह प्रशासनाकडे केली आहे. वनविभागाने या माकडाला पकडण्याकरिता गावात दोन वेळा जाळे लावले. एक वेळा पिंजरा लावला, तर दोन वेळा रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याला ट्रँक्यूलाईज (बेशुद्ध) करून पकडण्याचा प्रयत्न केला. पण, या माकडाला पकडण्यात वृत्त लिहिस्तोवर वनविभागाला यश आले नव्हते.

टॅग्स :Socialसामाजिक