शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सोमवार ‘कत्ल की रात’

By admin | Updated: February 20, 2017 00:02 IST

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यात. मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होईल.

छुप्या बैठकी : उमेदवारांमध्ये पडद्याआड ‘सेटिंग’ची शक्यताअमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रविवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्यात. मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. त्यापार्श्वभूमीवर सोमवारची रात्र ही उमेदवार आणि त्यांच्या सर्मथर्कांसाठी ‘कत्ल की रात’ ठरणारी आहे. आता छुप्या बैठकांचे सत्र सुरु होईल. उमेदवारांमध्ये पडद्याआड आपसी समझोता करण्यासाठी देखील सोमवारची रात्र निर्णायक ठरेल. या रात्रीकालिन बैठकींचे काय फलित निघाले, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल.यावेळी एकाच दिवशी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान होत आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या प्रचारासाठी येताना बड्या नेत्यांना अडचणी आल्या आहेत. सामाजिक कार्य, विकास कामे, भष्ट्राचार, राजकीय पक्षांचे ध्येय व उद्दिष्ट आणि विचारसणीच्या आधारे अनेक उमेदवारांनी प्रचाराचा मुद्दा बनविला होता. महापालिका निवडणुकीत ८७ जागांसाठी ६२८ उमेदवार रिंगणात आहेत. यानिवडणुकीत उमेदवारांनी ८ फेब्रुवारीपासून प्रचाराला सुरूवात केली. यासाठी त्यांना ११ दिवस मिळाले. जिल्हा परिषदेत ५९ जागांसाठी ४२२ उमेदवार तर पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी ५३१ उमेदवार रिंगणात आहेत. १५ फेब्रुवारीपासून ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा सुरु झाली. चार दिवसांनंतर रविवारी प्रचारतोफा थंडावल्या आहेत. यानिवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी अल्प कालावधी मिळाला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये उमेदवार मतदारांच्या भेटीकरिता पोहोचू शकले नाहीत. मात्र, अशा गावांमध्ये उमेदवारांच्या समर्थकांनी किल्ला लढविल्याचे चित्र आहे. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार तोफा शांत झाल्यानंतर आता सोमवारी रात्री विजयाचे गणित जुळविण्यासाठी छुप्या बैठकांचे सत्र सुरु होईल. महत्वाची व्यक्ती अथवा स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरुन तो परिसर काबीज करण्यासाठी राजकीय खेळी सोमवारच्या रात्री होईल, असे संकेत आहेत. छुप्या बैठकींमध्ये उमेदवारांकडून सौदेबाजी, मतांचा व्यवहार, लक्ष्मीदर्शन, दारुपार्ट्या, उमेदवारांची माघार घेणे, पैशांची देवाण-घेवाण, अफवा पसरवून मतांची टक्केवारी वाढविणे, जाती-धर्माचे समीकरण जुळवून आणणे आदी क्लृप्त्या लढविल्या जातील. काल-परवापर्यंत एकमेकांसोबत प्रचार करणाऱ्या उमेदवारांना एका रात्रीतूनच दूर करण्याची राजकीय खेळी करण्यात देखील उमेदवारांचे समर्थक मागेपुढे बघणार नाहीत, अशी चर्चा जाणकार करीत आहेत. काही उमेदवारांच्या हमखास विजयासाठी नेत्यांकडून मोठी सौदेबाजी होण्याची शक्यता आहे.सोमवारच्या रात्री नाकाबंदीसोमवारच्या रात्री निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांकडून मद्यपुरवठा, पैशांची आवक, शस्त्रसाठा येण्याची दाट शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा व शहराच्या सीमेवर सोमवारी रात्री नाकाबंदी केली जाणार आहे. मध्यप्रदेशातून दारू येणार असल्याची माहिती असून त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदीच्या माध्यमातून मोर्चेबांधणी चालविली आहे.संवेदनशील प्रभागांवर नजरमहानगरात काही प्रभाग पोलिसांनी संवेदनशील घोषित केले आहेत. निवडणुकीच्या दिवशी याप्रभागात कायदा व सुव्यस्थेची स्थिती निर्माण होण्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आहे. त्यानुसार याप्रभागांना सोमवारी रात्रीपासूनच पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. मुस्लिमबहुल भागात हे चित्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकेल.